श्री बळी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
By Admin | Updated: December 13, 2015 00:07 IST2015-12-13T00:07:38+5:302015-12-13T00:07:38+5:30
फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा

श्री बळी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
फ ाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात शोभायात्रानाशिक : मुंबई महामार्गावरील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या श्री बळी महाराज मंदिरात बळी महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त परिसरातून फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. मुंबई महामार्गावरील अति प्राचीन श्री बळी महाराज मंदिर रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे हे मंदिर रस्त्याच्या अगदी मधोमध आले होते. यामुळे या बळी महाराज मंदिरात देवदर्शन घ्यायला मोठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या नियमाप्रमाणे महामार्गावर धार्मिक स्थळे नसावी, असा नियम आहे. त्याप्रमाणे अमर मित्रमंडळ आणि श्री बळी महाराज देवस्थानच्या पदाधिकार्यांनी हे मंदिर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि जवळच असलेल्या मोकळ्या जागेत प्रशस्त नवीन मंदिर उभारण्यात आले. या मंदिराचा जीर्णोद्धार आणि श्री बळी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुक्रवार (दि.१२) सकाळी नऊ वाजता जुन्या बळी मंदिरापासून भव्य सवाद्य मिरवणुकीने व फटाक्यांच्या आतषबाजीत व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन मिरवणुकीनंतर श्री बळी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत पूजापाठ करून करण्यात आली. या शोभायात्रेत महिला भाविकांनी कपाळावर तुळशी घेतली होती. तसेच मिरवणूक मार्गावर भाविकांनी आकर्षक रांगोळ्या काढून मिरवणूक मार्ग सजविण्यात आला होता. या मिरवणुकीत बहुतांश जय जर्नादन भक्त परिवार सहभागी झाला होता. शोभायात्रेनंतर लगेचच महायज्ञाला प्रारंभ करण्यात आला. दीड दिवस चालणार्या या महायज्ञाला १२ जोडप्यांनी पूजाविधीत सहभाग घेतला. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, पंचवटी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, श्री बळी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष बाळूमामा शिंदे यांच्यासह शेकडो भाविक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)फोटो कॅप्शन-१२ पीएचडीसी-७० - श्री बळी महाराज मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक.