शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

रंग दाखविले! मेट्रो स्टेशनांचे काम तुर्कीच्या कंपनीला दिले; स्थानिक कंत्राटदारांनी पूर्ण करताच कंपनी पळाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:51 IST

India vs Turkey Pakistan: तुर्कीच्या कंपन्यांकडे देशातील विमानतळांची सुरक्षा, मेट्रोची सुरक्षा, सॉफ्टवेअर आदी जबाबदारी सोपविण्यात आली होती. एवढेच नाही तर ज्या मेट्रोचा एवढा गाजावाजा केला जातो, त्या मेट्रोच्या स्टेशन उभारणीची कामेही तुर्कीचीच कंपनी करते.

तुर्की किती विश्वासघातकी आहे हे त्यांनी याच महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धात सिद्ध केले आहे. याच तुर्कीच्या कंपन्यांकडे देशातील विमानतळांची सुरक्षा, मेट्रोची सुरक्षा, सॉफ्टवेअर आदी जबाबदारी सोपविण्यात आली होती. एवढेच नाही तर ज्या मेट्रोचा एवढा गाजावाजा केला जातो, त्या मेट्रोच्या स्टेशन उभारणीची कामेही तुर्कीचीच कंपनी करते. कानपूरमध्ये असाच प्रकार घडला असून काम पूर्ण झाल्यावर कंपनी टाळे ठोकून फुर्र झाली आहे. 

ऑपरेशन सिंदूरची धग अखेर तुर्कीपर्यंत पोहोचलीच! एअरलाईन्सची हवाच उतरली, पाकिस्तानला साथ दिली अन्...

झाले असे की कानपूर मेट्रोच्या तीन मार्गांवरील विस्ताराचे काम सुरु आहे. यासाठी चुन्नीगंज, बडा चौराहा आणि नवीन मार्केटसह चार स्टेशनचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. २०२१ मध्ये याचे कंत्राट तुर्कीची कंपनी गुलरकर्मव भारतीय सहयोगी कंपनी सेम इंडियाला मिळाले होते. या कंपन्यांनी हे काम स्थानिक कंत्राटदारांना दिले होते. त्यांच्याकडून काम पूर्ण करून घेतले आणि कामाचे पैसे न देता कंपनीने कार्यालयाला टाळे ठोकून पलायन केले आहे. 

या मेट्रो स्थानकांच्या कामासाठी ४० कंत्राटदारांना कामे देण्यात आली होती. या कंत्राटदारांचे ५५ कोटी रुपये या कंपनीने थकविले आहेत. मार्चपासून कंपनीने कंत्राटदारांना पैसे देणे थांबविले होते. परंतू, काम करण्याचा दबाव टाकत नंतर पैसे देण्याचे सांगितले जात होते. कंपनीचे कर्मचारी लवकर पैसे देण्याचे आश्वासन देऊन काम पूर्ण करण्यासाठी दबाव आणत होते असा आरोप करत हे कंत्राटदार आता अतिरिक्त शहर दंडाधिकारी अशोक कुमार गुप्ता यांच्याकडे गेले आहेत. त्यांनी निवेदन सादर केले आणि कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. 

जेव्हा सर्व कामे पूर्ण झाली तेव्हा कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर पैसे देण्यासाठी दबाव आणला, परंतू कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून पलायन केल्याचा आरोप या कंत्राटदारांनी केला आहे. 

टॅग्स :Metroमेट्रोfraudधोकेबाजीPakistanपाकिस्तान