मुंबईत इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन; शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, राहुल गांधी एकाच व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 09:02 AM2024-03-17T09:02:33+5:302024-03-17T09:04:22+5:30

काँग्रेसची न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली आहे, आज दादर येथील शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. या सभेमध्ये इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

Show of power of INDIA Opposition Alliance in Mumbai Sharad Pawar, Uddhav Thackeray, Akhilesh Yadav, Rahul Gandhi on the same platform | मुंबईत इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन; शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, राहुल गांधी एकाच व्यासपीठावर

मुंबईत इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन; शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, राहुल गांधी एकाच व्यासपीठावर

Congress ( Marathi News ) : काँग्रेसची गेल्या ६३ दिवसापासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली आहे. दरम्यान, आज दादरमधील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी उपस्थित आहेत. काल त्यांनी चैत्य भूमीवर भेट दिली. 

लोकसभा निवडणूक २०२४ विशेष लेख: नणंद विरुद्ध भावजय आणि भाऊ-बहीण नेमके कुठे..?

६३ दिवस सुरू असलेल्या या यात्रेची आज सांगता होणार आहे. आज रविवार १७ मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात इंडिया आघाडीचे सर्व दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार,काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत.

 "मुंबईतील दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आम आदमी पार्टी आणि विरोधी आघाडीच्या इतर मित्रपक्षांचे प्रतिनिधीही या रॅलीत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा विविध राज्यांतून  शनिवारी दुपारी मुंबईत पोहोचली. आज होणाऱ्या सभेत इंडिया आघाडीचे नेते भाजपवर जोरदार निशाणा शाधू शकतात. कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. 

काल माध्यमांसोबत बोलताना नाना पटोले म्हणाले, देशातील जनता राहुल गांधी यांच्यासोबत आहे. राहुल गांधी यांनी जनतेच्या समस्या समजून घेऊन संपूर्ण देशाचा दौरा केला. त्याला महिला, युवक आणि किसान सभेचा पाठिंबा मिळत आहे. प्रत्येकजण त्यांच्यात सामील होतो. इंडिया अलायन्ससोबतच देशातील सर्व जनतेचा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. संविधान आणि लोकशाहीसाठी ते लढत आहेत.

Web Title: Show of power of INDIA Opposition Alliance in Mumbai Sharad Pawar, Uddhav Thackeray, Akhilesh Yadav, Rahul Gandhi on the same platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.