परीक्षेच्या प्रवेशपत्रावर श्वानाचे छायाचित्र

By Admin | Updated: June 29, 2015 11:59 IST2015-06-28T23:51:21+5:302015-06-29T11:59:36+5:30

आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या एका उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर त्याच्याऐवजी श्वानाचे छायाचित्र छापण्याचा अजब कारनामा समोर आला आहे.

The shot photo on the entrance address | परीक्षेच्या प्रवेशपत्रावर श्वानाचे छायाचित्र

परीक्षेच्या प्रवेशपत्रावर श्वानाचे छायाचित्र

मिदनापूर (प.बंगाल) : आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या एका उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर त्याच्याऐवजी श्वानाचे छायाचित्र छापण्याचा अजब कारनामा समोर आला आहे.
सौम्यदीप महतो (१८) असे या उमेदवाराचे नाव आहे. सौम्यदीपने सरकारी संकेतस्थळावरून आपले आयटीआय प्रवेश परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र डाऊनलोड केले आणि हे प्रवेशपत्र पाहून त्याला चांगलाच धक्का बसला. या प्रवेशपत्रावर त्याचे नाव, गाव, पत्ता होता; मात्र छायाचित्राच्या जागी त्याच्याऐवजी एका श्वानाचे छायाचित्र छापलेले होते.
सौम्यदीपने यावर्षी उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केली होती. आपल्या प्रवेशपत्रावर श्वानाचे छायाचित्र पाहून त्याने लगेच संबंधित अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. यानंतर काही तासातच त्याच्या प्रवेशपत्रावरील कुत्र्याचे छायाचित्र हटविण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: The shot photo on the entrance address