मोमीनपुऱ्यात गोळी झाडली

By Admin | Updated: August 13, 2015 22:34 IST2015-08-13T22:34:35+5:302015-08-13T22:34:35+5:30

नागपूर : क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यावर देशीक˜ा ताणून गोळी झाडल्याची घटना गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास भानखेडा, मोमीनपुरा परिसरात घडली. क˜्यातून निघालेली गोळी जमिनीत गेल्यामुळे फिर्यादी तरुणाला कसलीही दुखापत झाली नाही. दरम्यान, गोळी झाडल्याचा पोलिसांनी इन्कार केला आहे.

Shot in Mominpur | मोमीनपुऱ्यात गोळी झाडली

मोमीनपुऱ्यात गोळी झाडली

गपूर : क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यावर देशीकट्टा ताणून गोळी झाडल्याची घटना गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास भानखेडा, मोमीनपुरा परिसरात घडली. कट्ट्यातून निघालेली गोळी जमिनीत गेल्यामुळे फिर्यादी तरुणाला कसलीही दुखापत झाली नाही. दरम्यान, गोळी झाडल्याचा पोलिसांनी इन्कार केला आहे.
आरोपीचे नाव मकसूद अन्सारी अब्दुल रशीद अन्सारी (वय २६) असून, तो भानखेडा कब्रस्तानजवळ राहतो. त्याच्या शेजारीच मोहम्मद मुश्ताक (वय ३८) राहतात. गुरुवारी दुपारी १ वाजता मोहम्मद मुश्ताकचा मुलगा अब्बान (वय १०) सायकल चालवीत होता. आरोपी मकसूदने अब्बानच्या सायकलला लाथ मारली. ते पाहून मुश्ताक जाब विचारण्यासाठी मकसूदकडे गेला. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे आरोपी मकसूदने घरातून देशीकट्टा आणून मुश्ताकवर गोळी झाडली. मात्र, कट्टा जुनाट असल्यामुळे गोळी वेडीवाकडी जात जमिनीत शिरली. त्यामुळे मुश्ताक बचावला. दरम्यान, गोळीबार झाल्याची चर्चा पसरल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. मुश्ताकने दिलेल्या माहितीवरून तहसीलचे ठाणेदार संतोष खांडेकर आपल्या ताफ्यासह भानखेड्यात पोहचले. त्यांनी मकसूदची शोधाशोध केली. मकसूदविरुद्ध प्राणघातक हल्ला करणे आणि देशीकट्टा बाळगण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. मात्र मकसूदने गोळी झाडल्याचा इन्कार केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
--
यापूर्वीही झाडली होती गोळी
आरोपी मकसूद अन्सारीच्या घरी पॉवरलूम आहे. मात्र, तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याने मुश्ताकचा भाऊ इसरार अहमद याच्याशी बकरी घराकडे आली म्हणून वाद घातला होता. त्यानंतर त्याने इसरारवर गोळी झाडली होती. जखमी इसरारने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यावेळी आरोपीला अटक केली होती. मात्र, त्यावेळी एका अधिकाऱ्याने मांडवली केल्यामुळे हे प्रकरण झटपट निपटले. त्याचमुळे आरोपी निर्ढावला. विशेष म्हणजे, गेल्या वेळी गोळीबारात जखमी झालेल्या इसरारला काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.
---

Web Title: Shot in Mominpur