शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

७० वर्षांतील उणिवा ६ वर्षांत झाल्या दूर; भाजप अध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 06:37 IST

जे. पी. नड्डा : काँग्रेसने केले अडथळे आणण्याचे काम

नितीन अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मागील ७० वर्षांतील उणिवा मोदी सरकारच्या ६ वर्षांतील कार्यकाळात दूर झाल्या आहेत, असा दावा भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या आभासी पत्रकार परिषदेत नड्डा यांनी हे वक्तव्य केले. काँग्रेसने केवळ अडथळे आणण्याचे काम केले, असा आरोपही नड्डा यांनी केला.

नड्डा यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागासह योग्य वेळी योग्य निर्णय घेतले गेले आहेत. त्यामुळेच भारतातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. बड्या राष्ट्रांच्या आरोग्य सेवा कोलमडल्या असताना भारतात लॉकडाऊनच्या काळात दररोजची कोरोना टेस्ट क्षमता १० हजारांवरून १.६० लाखांवर गेली आहे. आज देशात दररोज ४.५० लाख पीपीई कीट्स बनविल्या जात आहेत. ५८,००० व्हेंटिलेटर्स बनत आहेत. ५०,००० व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून खरेदी केले जात आहेत. आपण आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने चाललो आहोत. नड्डा यांनी सांगितले की, मोदी सरकारने दुसºया कार्यकाळातील पहिल्या वर्षात ३७० अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील धार्मिक आधारावर पीडित होऊन आलेल्या लोकांना मुख्य धारेत सहभागी होण्याची संधी मिळाली. पंतप्रधानांच्या इच्छाशक्तीचा हा परिणाम आहे. त्याचे सूत्रधार गृहमंत्री अमित शहा हे बनले.नड्डा यांनी म्हटले की, मोदी सरकारने तीन तलाक रद्द करून मुस्लिम महिलांची वेदना दूर केली. दहशतवादाशी लढण्यासाठी यूएपीए बनविला.नड्डा यांनी सांगितले की, अयोध्येतील राममंदिराचे भाजपचे स्वप्न पूर्ण झाले. राममंदिराला काँग्रेसमुळे उशीर झाला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊ नये, यासाठी काँग्रेसने सतत अडथळे आणले.नड्डा यांनी सांगितले की, छोट्या कार्यकाळात जे मोठे निर्णय मोदी सरकारने घेतले, ते भाजप सर्व जनतेपर्यंत पोहोचवील. यासंबंधातील मोदी यांच्या पत्रास १० कोटी लोकांपर्यंत पोहोचविले जाईल. २५० आभासी पत्रकार परिषदा, २ हजारांपेक्षा अधिक आभासी रॅली आणि भाजपच्या प्रत्येक आघाडीच्या ५०० रॅली आयोजित करण्यात येतील.

कोरोनाचे राजकारण नकोनड्डा यांनी सांगितले की, भाजपने कोरोना संकटावर राजकारण केले नाही. काँग्रेसचे वर्तन मात्र जबाबदारीचे नाही. भाजपचा सेवेवर विश्वास आहे.च्श्रमिकांना त्रास सहन करावा लागला, हे खरे आहे. तथापि, भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस मात्र निरर्थक मुद्दे उपस्थित करून देशाची दिशाभूल करीत आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस