संक्षिप्त बातम्यांचा प˜ा

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:26+5:302015-02-18T00:13:26+5:30

विहिरीत पडलेल्या सापाला जीवदान

Short news address | संक्षिप्त बातम्यांचा प˜ा

संक्षिप्त बातम्यांचा प˜ा

हिरीत पडलेल्या सापाला जीवदान
नाशिक : सामनगाव रोडजवळच्या एका विहिरीत पडलेल्या विषारी सापाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. भीमराव बोराडे यांच्या विहिरीत साप पाण्यावर तरंगत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी सापाला बाहेर काढले.

जातीबद्दलच्या अंधश्रद्धा दूर करा : परदेशी
नाशिक : प्रौढ नागरिक मित्रमंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी घारापुरी लेणी सहल घडविली. मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी यात्रा कंपनीच्या बसने सहल झाली. सहलीत सुमारे ४० जणांनी सहभाग नोंदविला.

एसटी बस अपघातात प्रवासी किरकोळ जखमी
नाशिक : शहराजवळील त्र्यंबकेश्वररोड येथून जाणार्‍या एस. टी. महामंडळाच्या बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली. सोमवारी (दि.१६) चार वाजता तळेगाव फाट्यावर हा अपघात घडला.

डाळिंबाची आवक कमी तरीही दर घसरले
नाशिक : मागणीच्या तुलनेत घट झाल्यास दर वाढते, असा सर्वसाधारण नियम असताना डाळिंबाची गेल्या आठवड्यापेक्षा यावेळी आवक घटूनही दरवाढ न होता घसरण झाली आहे. नाशिक बाजार समितीत तीन ते साडेसहा हजार रुपये क्विंटल दर आहे.

Web Title: Short news address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.