थोडक्यात नागपूर

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:23+5:302015-02-06T22:35:23+5:30

विज्युक्टाची शिक्षण उपसंचालकांशी चर्चा

In short, Nagpur | थोडक्यात नागपूर

थोडक्यात नागपूर

ज्युक्टाची शिक्षण उपसंचालकांशी चर्चा
नागपूर : विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनने नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्यासोबत विविध प्रश्नांवर सभा आयोजित केली. विज्युक्टाचे महासचिव प्रा. अशोक गव्हाणकर यांच्या नेतृत्वात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून विभागीय स्तरावरील प्रश्न निकाली काढले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची २४ वर्षानंतर निवड श्रेणीची अनेक प्रकरणे १५ दिवसात निकाली काढण्याचे मान्य करण्यात आले. अनियमित पगार, शिक्षकांना हेतुपुरस्सर देण्यात येणारा त्रास, वेतनवाढी थांबविणे आदी मागण्या निकाली काढण्याचे यावेळी मान्य करण्यात आले. चर्चेत सहायक संचालक डॉ. एस.एन. पटवे, संघटनेचे डॉ. नारायण निकम, प्रा. सुभाष अंधारे, प्रा. शशी मिश्रा, प्रा. नामदेव घोळसे आदी सहभागी झाले होते.

सुभाष मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन
नागपूर : सुभाष मंडळातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त सुभाष मंडळाच्या मैदानावर भारतीय विद्या भवन नागपूर केंद्राच्या सहकार्याने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे विश्वस्त दिनकर चारमोडे, डॉ. ए. के. मुखर्जी, डॉ. राजेंद्र चांडक, श्रीपत बुरडे, कृष्णा पंधराम, हरिचंद्र ठाकरे, बाबू पटेल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. संचालन मोहन जाधव यांनी केले. आभार वसंता देवठाकळे यांनी मानले. परीक्षक म्हणून मोहन पडवंशी, मोहन जाधव, डॉ. प्रतिभा ठाकरे उपस्थित होते. प्रथम क्रमांकाचे लोकनृत्याचे पारितोषिक नवयुग प्राथमिक शाळेला, द्वितीय पारितोषिक पंचतत्त्व शारदा ग्रुप, तृतीय ब्लॉसम केज ग्रुपला तर प्रोत्साहनपर अक्षय नृत्य सम्राट ग्रुप, जी.जी.डी. डान्सिंग ग्रुप, संस्कृती कला ग्रुप, गणेश ग्रुप यांना देण्यात आले.

वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचा मेळावा
नागपूर : महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार आणि मेळाव्याचे आयोजन सिव्हिल लाईन्सच्या जवाहर विद्यार्थीगृहात करण्यात आले. मेळाव्याला आमदार समीर मेघे, बाबासाहेब हरदास, नानासाहेब बिचवे, बी.एस. नागपूरकर, श्याम देशमुख, सुभाष भावसार, बी. एच. डोंगरे, के. पी. राऊत, प्रकाश येंडे उपस्थित होते. निवृत्त ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. संचालन प्रभाकर परांजपे यांनी केले. आभार नारायण तलमले यांनी मानले.

Web Title: In short, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.