थोडक्यात नागपूर
By Admin | Updated: September 4, 2015 21:54 IST2015-09-04T21:54:25+5:302015-09-04T21:54:25+5:30
फोटो रॅपमध्ये मॉम नावाने

थोडक्यात नागपूर
फ टो रॅपमध्ये मॉम नावानेम्युझियम ऑफ म्युझिकचा अवॉर्ड यंदा नागपुरात नागपूर : म्युझियम ऑफ म्युझिक (मॉम इंडिया), पुणे येथील संस्थेच्या ४३ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात संगीत व कला क्षेत्रातील कलावंतांचा एक्सलन्सी अवॉर्डने सन्मान करण्यात आला. या संस्थेतर्फे देशविदेशात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रख्यात गायक सोनू निगम यांची सुरुवातही मॉम इंडियातूनच झाली. यंदाचा एक्सलन्सी इन सिंगीग ॲण्ड म्युझिक हा पुरस्कार नागपुरातील ड्रीमकॉर्ड म्युझिआर्टचे संचालक प्रशांत चेंडके यांना प्रदान करण्यात आला आहे. यापूर्वी हा पुरस्कार सोनू निगम, सचिन पिळगावकर, मोहन जोशी आदी दिग्गज कलावंतांना प्रदान करण्यात आला. पुण्याच्या पं. नेहरू सभागृहात झालेल्या या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला नेदरलँड्सचे धर्मराज डोईखी, मॉम इंडियाचे संचालक मोहनकुमार भंडारी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रशांत चेंडके यांना किशोरकुमार यांच्या गीतांचे आणि प्रामुख्याने किशोरदांच्या याडलिंगची गीते उत्कृष्ट सादर करीत असल्याबद्दल प्रदान करण्यात आला. याप्रसंगी किशोरदा, मो. रफी आणि मुकेश यांच्या गीतांचा सुरेल कार्यक्रम झाला.