थोडक्यात नागपूर

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:39+5:302015-02-15T22:36:39+5:30

झाडे सुवर्णकार सेवा समाज

In short, Nagpur | थोडक्यात नागपूर

थोडक्यात नागपूर

डे सुवर्णकार सेवा समाज
नागपूर : झाडे सुवर्णकार सेवा समाजातर्फे नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव संतोषी भवन, निकालस मंदिर, इतवारी येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष अनिल वाजे, विवेक डुमरे, ओंकारेश्वर गुरव, अनिल धरमठोक, विवेक डुमरे, केशव ढोमणे, रिता रोकडे, सुचिता रोकडे, शांताबाई निनावे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी काढण्यात आले्या पालखी यात्रेचे नेतृत्व प्रशांत उरकुडे, सूरज ढोमणे, रवी रोकडे, रवी गुरव, मनीषा रोकडे, मनीषा गुरव यांनी केले. संचालन उमेश निनावे यांनी केले. आभार मंगेश गजापुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर भुजाडे, विनोद ढोमणे, नरेश मस्के, दिनकर येरपुडे, किशोर अरमरकर, प्रशांत ढोमणे आदींनी परिश्रम घेतले.
--------
पतंजली योग समिती
नागपूर : योग माणसाला निरोगी राहण्याची कला शिकविते. योग स्वस्थ जीवनाची गुरुकिल्ली आहे. स्वामी रामदेव यांची शिबिरे व त्यांच्या कार्यक्रमाने घराघरात योगाचे महत्त्व पोहोचविले आहे, असे मत नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी व्यक्त केले. रमणा मारुती येथील त्रिकोणी मैदानात पतंजली योग समितीच्यावतीने आयोजित सहा दिवसीय योग शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी सर्व आयोजकांचे अभिनंदन करून सर्व उद्यानात अशा शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव फटिंग होते. डॉ. जीवेश पंचभाई यांनी स्वस्थ दिनचर्येबाबत माहिती दिली. डॉ. विजय धुर्गे, नयना झाडे, छाजूराम मिश्रा, उर्मिला जुवारकर, शोभा भागिया, माधुरी ठाकरे, सीमा धांडे, मीना अस्वले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कोकाटे यांनी कार्यक्रमाचे संचालन तर आभार नयना झाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय वंगलवार, रमेश ठोंबरे, गंगाधर कडू, संजय झाडे, शेषराव लांजेवार, तितरमारे, क्षीरसागर, गाढवे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: In short, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.