थोडक्यात नागपूर

By Admin | Updated: December 19, 2014 23:19 IST2014-12-19T23:19:47+5:302014-12-19T23:19:47+5:30

रघुजीनगरातील गांधी मार्केट अनधिकृत

In short, Nagpur | थोडक्यात नागपूर

थोडक्यात नागपूर

ुजीनगरातील गांधी मार्केट अनधिकृत
नागपूर : महानगरपालिके च्या निर्मितीत सर्वसामान्य नियम नाहीत. विविध कारणांनी होणारी वाढ आणि त्या वाढीचा वेग लक्षात घेता विशिष्ट सूत्र निश्चित करणे मनपा आणि नासुप्रला अवघड झाले आहे. नियमानुसार प्रत्येक वस्तीत नागरिकांसाठी मैदान असणे आवश्यक आहे. पण नासुप्र आणि मनपाने तसेच राजकीय लोक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रघुजीनगर येथील अनधिकृत बांधकामासाठी मार्केट तयार करून सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत, असे प्रतिपादन जनप्रहारचे संस्थापक प्रदीप गाडगे यांनी निवेदनात व्यक्त केले आहे.
रघुजीनगर येथे मॉडेल मिल कर्मचाऱ्यांसाठी मैदानाची जागा मंजूर असताना जागेच्या वापरात बदल घडवून आणण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी निवेदन देऊनही केवळ आश्वासन मिळाले पण कारवाई झालेली नाही. शहरातील ही मध्यवर्ती जागा कामगारांच्या मैदानासाठी होती. पण नासुप्र, विकासक आणि मनपा तसेच राजकीय पुढाऱ्यांनी एकत्रित येत ही जागा बाजारपेठेसाठी वापरली. व्यावसायिक हेतूसाठी या जागेचा उपयोग होऊ शकत नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून हे मार्केट तयार करण्यात आले. या जागेचा नकाशासुद्धा मंजूर नव्हता, ही अत्यंत खेदाची बाब आहे. ही जागा नागरिकांच्या मैदानासाठी खुली करावी, अशी मागणी योगेश बावनकर, अरुण राऊत, अरुण मुंडे यांनी केली आहे.

Web Title: In short, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.