थोडक्यात गुन्हे वार्ता...
By Admin | Updated: August 1, 2015 01:11 IST2015-08-01T01:11:29+5:302015-08-01T01:11:29+5:30
मनासारखी टीप न मिळाल्यामुळे गार्डचा हल्ला

थोडक्यात गुन्हे वार्ता...
म ासारखी टीप न मिळाल्यामुळे गार्डचा हल्ला नागपूर : मनसारखी टीप न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या बीअरबारच्या गार्डने एका तरुणावर हल्ला चढवला. त्यामुळे नितीन जेठानंद चेलवानी (रा. छापरूनगर चौक) हा तरुण यात जबर जखमी झाला. अजंता बार जवळच्या पार्किंगमधून नितीन गुरुवारी रात्री १०.४५ ला त्याची गाडी काढत होता. बारचा गार्ड पांडे याने त्याला टीप मागितली. नितीनने त्याच्या हातात १० ची नोट ठेवली. ती कमी वाटल्यामुळे पांडेने पुन्हा जास्त पैसे मागितले. नितीनने त्याची कानउघाडणी केल्यामुळे गार्डने वाद घातला. त्यानंतर लोखंडी सळाखीने नितीनच्या हातावर फटका मारला. नितीनला जबर दुखापत झाली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे. --- करंट लागल्यामुळे मजुराचा मृत्यू नागपूर : बांधकामस्थळी पाणी देण्यासाठी लाईन जोडत असताना करंट लागल्यामुळे कळमन्यात जनक भानुराम केकती (वय ३५, रा. भांडेवाडी, नागपूर) या तरुणाचा करुण अंत झाला. शुक्रवारी सकाळी ९.१५ ला ही घटना घडली. कळमना पोलिसांनी गोपाल भानुराम केकती (वय २६) याच्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली.---गळफास लावून आत्महत्या नागपूर : अजनीतील कुकडे ले आऊट, गुप्ता पान मंदिरजवळ राहणारे विजय गोपीचंद तेलतंुबडे (वय ४५) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी २ वाजता ही घटना उघडकीस आली. अजनी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे