संक्षिप्त...

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:27+5:302015-02-18T00:13:27+5:30

शिक्षकांच्या वेतनासाठी १०५ कोटी द्यावेत

Short ... | संक्षिप्त...

संक्षिप्त...

क्षकांच्या वेतनासाठी १०५ कोटी द्यावेत
मुंबई :
अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या व वर्ग तुकड्यांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी पुरवणी मागणी मान्य करून १०५ कोटी रुपये मंजूर करण्यात यावे अशी मागणी शिक्षक परिषदेने राज्य शासनाकडे केली आहे. या संदर्भात आमदार रामनाथ मोते यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहून येत्या अधिवेशनात वित्त विभागाकडे या विषयी शिफारस करण्याची मागणी केली आहे.
.........

संशोधन अहवालाचे प्रकाशन
मुंबई :
राज्यातील भटक्या जमातीतील मुलांच्या शिक्षणाचा अधिकार या विषयावरील संशोधन अहवालाचे प्रकाशन बुधवारी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय भटके आणि निम-भटके जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी ईदाते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.

Web Title: Short ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.