संक्षिप्त...
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:28+5:302015-01-23T23:06:28+5:30
बोरिवलीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन

संक्षिप्त...
ब रिवलीत चित्रकला स्पर्धेचे आयोजनमुंबई :युथ कल्चरल असोशिएशनच्या वतीनेयेथे २५ जानेवारीला बोरिवली येथील वीर सावरकर उद्यानात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही चित्र काढण्याचा आनंद घेता येणार आहे. सकाळी ८ ते १० या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी सात गट ठेवण्यात आले आहेत. या गटामध्ये पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी ते पंधरावी,खुला गट, सिनिअर सिटीझन्स आणि अपंग व्यक्ती यांचा समावेश आहे..................प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान जागृती अभियानमुंबई :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे संचलित वडाळा येथील डॉ. आंबेडकर लॉ महाविद्यालयाने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान जागृती अभियानाचे आयोजन केले आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वडाळा महाविद्यालय ते दादर स्थानकापर्यंत संविधान मार्च काढण्यात येणार आहे. यावेळी महाविद्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेचे विनामुल्य वाटप होईल, असे महाविद्यालयाचे प्राचार्य जयमंगल धनराज यांनी सांगितले.............बौद्ध बनो- बौद्ध जोडो अभियानमुंबई :भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रिपब्लिकन जनआंदोलन संघटनेच्या वतीने बौद्ध बनो- बौद्ध जोडो अभियान राबविण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता माटुंगा लेबर कॅम्प येथील डॉ. आंबेडकर समाज मंदीर हॉलमध्ये जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रेमरत्न चौकेकर भूषविणार असून प्रमुख वक्ते म्हणून आगरी कोळी शेतकरी समाज प्रबोधिनीचे राजाराम पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी शंकर महाजन, डॉ. जयप्रकाश घुमटकर, प्रा. सुधाकर पवार यांच्यासह विभागातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.