दुकानाचे शटर तोडून चोरी करणारे दोघे गजाआड
By Admin | Updated: June 21, 2016 22:12 IST2016-06-21T22:12:30+5:302016-06-21T22:12:30+5:30
जळगाव : दुकानाचे शटर तोडून चोरी करणारे सलीम करीम तडवी (वय २६) व शकीर लालखा तडवी (वय ३२) दोघे रा.देऊळगाव गुजरी, ता.जामनेर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

दुकानाचे शटर तोडून चोरी करणारे दोघे गजाआड
ज गाव : दुकानाचे शटर तोडून चोरी करणारे सलीम करीम तडवी (वय २६) व शकीर लालखा तडवी (वय ३२) दोघे रा.देऊळगाव गुजरी, ता.जामनेर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.पहूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५७, ३८० नुसार दाखल गुन्ाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देऊळगाव गुजरी गावात संशयित सलीम तडवी व शकीर तडवी हे संशयितरीत्या फिरताना मिळून आले. चौकशी दरम्यान, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नीळकंठ पाटील, हवालदार उत्तमसिंह पाटील, ईश्वर सोनवणे, बापू पाटील, इद्रीस पठाण यांनी केली. पुढील कारवाईसाठी दोघा संशयितांना पहूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.