पाकिस्तानचे झेंडे फडकावणा-यांना गोळ्या घाला - तोगडिया

By Admin | Updated: June 15, 2015 12:45 IST2015-06-15T10:03:20+5:302015-06-15T12:45:51+5:30

जी लोकं पाकिस्तानचे झेंडे फडकावतात व त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देतात अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे असे प्रक्षोभक विधान विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केले आहे.

Shoots Pakistan's flag flogging - Togadia | पाकिस्तानचे झेंडे फडकावणा-यांना गोळ्या घाला - तोगडिया

पाकिस्तानचे झेंडे फडकावणा-यांना गोळ्या घाला - तोगडिया

ऑनलाइन लोकमत 

राजकोट, दि. १५ - जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावण्याच्या घटनांवर चिंता व्यक्त करत जी लोकं पाकिस्तानचे झेंडे फडकावतात व त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देतात अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे असे प्रक्षोभक विधान विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. 

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून फुटिरतावादी नेत्यांच्या सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावले जात आहे. या विषयी प्रवीण तोगडिया यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जम्मू काश्मीरमधील या घटना चिंताजनक आहेत. केंद्रातील भाजपा सरकार काश्मीरमधील फुटिरतावादी नेत्यांवर लगाम लावण्यास अपयशी ठरत आहे अशी टीकाही त्यांनी केली. केंद्र सरकारने पाक समर्थकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. 

योग करताना ओमऐवजी अल्लाहचे नाव घेणे म्हणजे शंकराचा अपमान असून हिंदू हे कधीच स्वीकारणार नाही असे देखील तोगडिया यांनी म्हटले आहे.  

 

Web Title: Shoots Pakistan's flag flogging - Togadia