शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:23 IST

पोलिसांच्या चौकशीत बिश्नोई गँगच्या शूटरने मोठा खुलासा केला आहे.

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. काही दिवसापूर्वी पोलिसांनी हरयाणामधून सुख्खू या शुटरला ताब्यात घेतले. या शूटरची आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे, चौकशीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. या शुटरने २०२२ मध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार याच्या सांगण्यावरून सलमान खानच्या मुंबईतील पनवेल फार्म हाऊसची रेकी केली होती. तो सलमान खानवर हल्ला करणार होता, पण त्याचा प्लॅन फसला.

"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन

लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर सुख्खाने रेकी करण्यासाठी सलमान खानच्या गार्डशी मैत्री केली होती. जून २०२४ मध्ये नवी मुंबईतील त्याच्या फार्महाऊसवर जाताना सलमान खानला टार्गेट केल्याचा दावाही मुंबई पोलिसांनी केला आहे. मात्र, त्याचा हा प्लॅन फसला. हा कट रचण्यापूर्वी एप्रिलमध्ये सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला होता.

या घटनेमुळे सलमान खानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावेळी सलमान खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय व्यक्त केला होता. सलमान खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, हा हल्ला त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना मारण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे.

सुख्खाला चार दिवसापूर्वी हरयाणातील पानिपत येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांना आधीच त्याची माहिती मिळाली होती. अशा परिस्थितीत नवी मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर  पोलीस पानिपतला पोहोचले. यादरम्यान सुख्खा ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्याच हॉटेलमध्ये पोलिसही थांबले. मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाईत सुख्खाला अटक केली.

पोलिसांनी सुख्खा याला ताब्यात घेतले तेल्हा तो मद्याच्या नशेत होता, त्याला त्याचे नावही सांगता येत नव्हते. याशिवाय ओळख लपवण्यासाठी त्याने दाढीही वाढवली होती. मात्र पोलिस रेकॉर्डमध्ये असलेल्या फोटोच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Salman Khanसलमान खानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस