शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

मास्टर माइंड साईबाबासह पाच आरोपींना धक्का, निर्दोष सोडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ठरवला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 07:34 IST

Court: दहशतवादी कारवायांचा आरोप असलेला नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांना निर्दोष सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दहशतवादी कारवायांचा आरोप असलेला नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांना निर्दोष सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. तसेच, हे प्रकरण कायद्यानुसार व गुणवत्ता विचारात घेऊन नव्याने निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय एम. आर. शाह व सी. टी. रवी कुमार यांनी केवळ प्रकरणातील पक्षकारांची सहमती लक्षात घेता निर्णय दिला. प्रकरणाची गुणवत्ता विचारात घेतली नसल्याने सुनावणीदरम्यान नोंदविलेल्या निरीक्षणांनी उच्च न्यायालयाने प्रभावित होऊ नये, असे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रोहित देव व अनिल पानसरे यांनी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी आदेश दिला होता. प्रकरणावर नवीन न्यायपीठामध्ये कार्यवाही पूर्ण करून चार महिन्यांत निर्णय द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnaxaliteनक्षलवादी