शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

धक्कादायक! पत्नीला 10 मिनिटांचा उशीर झाला, पतीनं फोनवरुनच 'ट्रिपल तलाक' दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 17:42 IST

तलाक देण्यात आलेली पीडित महिला आपल्या पतीला सांगून घराबाहेर गेली होती. घराबाहेर जाताना केवळ 30 मिनिटांत परत येणार असल्याचं तिनं म्हटलं होतं.

लखनौ - लोकसभेत ट्रिपल तलाक विधेयक मंजुर झाल्याच्या आठवडा भरानंतरच एका मुस्लीम महिलेला तिच्या पत्नीने फोनवरुन तलाक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, केवळ घरी येण्यास 10 मिनिटांचा उशीर झाल्याचं कारण देत पतीकडून तलाक देण्यात आल्याचा आरोप पीडित पत्नीने केला आहे. याबाबत पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशच्या इताह जिल्ह्यातील अलिगंज येथे ही घटना घडली आहे. 

तलाक देण्यात आलेली पीडित महिला आपल्या पतीला सांगून घराबाहेर गेली होती. घराबाहेर जाताना केवळ 30 मिनिटांत परत येणार असल्याचं तिनं म्हटलं होतं. मात्र, येण्यास उशीर झाल्यामुळे पतीने तलाक (डायव्होर्स) दिल्याचं तिनं सांगितलं. पीडिता आपल्या आईच्या घरी गेली होती. आजी आजारी असल्यामुळे तिला पाहण्यासाठी, तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ती आईच्या घरी गेली होती. त्यावेळी, 30 मिनिटे होऊनही ती परतली नसल्याने तिच्या पतीने तिच्या भावाच्या मोबाईलवर फोन केला. तसेच, फोनवरुनच तलाक दिल्याचंही म्हटलं. पतीच्या या उत्तराने मी निशब्द झाल्याचं तिनं म्हटलंय. 

पीडितीने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी पतीकडून मारहाण होत असल्याचेही तिने म्हटले. कारण, लग्नावेळी तिच्या कुटुंबीयांनी हुंडा दिला नव्हता. त्यामुळे पती नेहमीच यावरुन वाद घालत होता. तर, मला जबरदस्तीनं अबॉर्शनही करण्यास भाग पाडल्याचा आरोप तिने केला आहे. दरम्यान, माझ्या आईचे कुटुंब गरीब असून पतीच्या मागण्या पूर्ण करणं त्यांच्यासाठी शक्य नाही. याप्रकरणी सरकारने लक्ष घालून मला मदत करावी, अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याचंही तिनं म्हटलं आहे. दरम्यान, अलिगंजचे एरिया ऑफिसर अजय भदौरिया यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याची खात्री दिलीय. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याचंही आश्वासन दिलंय. लोकसभेत 27 डिसेंबर रोजी ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाले होते.   

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस