शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चौथीही मुलगीच झाल्याने पतीनं पत्नीला दिले पेटवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 17:50 IST

उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यातील शाहजहांपुरातील कटरा भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुत्राच्या हव्यासापोटी एक पतीनं पत्नीला जिवंत पेटवून दिले आहे.

बरेली- उत्तर प्रदेशमधल्या बरेली जिल्ह्यातील शाहजहांपुरातील कटरा भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुत्राच्या हव्यासापोटी एक पतीनं पत्नीला जिवंत पेटवून दिले आहे. पुत्राच्या ऐवजी चौथीही मुलगीच झाल्यानं त्या क्रूरकर्मा पतीनं हे अमानुष कृत्य केलं आहे. पतीनं पेटवून दिल्यानंतर 28 वर्षांची पत्नी क्षमा शर्मा हिचा जागीच मृत्यू झाला.या हत्ये प्रकरणात पोलिसांनी नराधम पती सतीश शर्माला अटक केली आहे.  क्षमा आणि सतीश 2010साली विवाहबद्ध झाले होते. सतीश हा कपड्यांचं दुकान चालवत असल्यानं घरची परिस्थितीत ठीक होती. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत क्षमाही खूश होती. परंतु पहिलं कन्यारत्न झाल्यानंतर सतीश क्षमाला त्रास देऊ लागला.मुलाच्या हव्यासापोटी सतीशला लागोपाठ तीन मुली झाल्या. चौथ्यांदा मुलगा होईल ही सतीशला आशा होती. परंतु चौथीही मुलगीच झाल्यानंतर सतीशच्या संतापाला पारावार उरला नाही आणि त्या नराधमानं पत्नीलाच पेटवून दिलं.  चौथी मुलगी आठ महिन्यांची होईपर्यंत सतीश सातत्यानं क्षमाला त्रास देत होता. तो शांत होईल असे वाटत असतानाच तो अधिक आक्रमक झाला. सतीशने क्षमा झोपत असतानाच तिला पेटवून दिले आणि घराला बाहेरून टाळं ठोकून त्यानं पोबारा केला. जळालेल्या अवस्थेत मदतीसाठी याचना करणा-या क्षमाला शेजा-यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला.  लोकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व क्षमाला रुग्णालयात हलवले. मात्र 90 टक्क्यांहून अधिक भाजल्यानं क्षमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :Womenमहिलाfireआग