अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार वर्षभरापासून १० पारधी कुटुंबे वाळीत उपोषणाकडे सरकारची पाठ
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:24+5:302015-02-18T00:13:24+5:30
फोटो मेल करत आहे.

अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार वर्षभरापासून १० पारधी कुटुंबे वाळीत उपोषणाकडे सरकारची पाठ
फ टो मेल करत आहे..............अहमदनगरमधील धक्कादायक प्रकारवर्षभरापासून १० पारधी कुटुंबे वाळीतउपोषणाकडे सरकारची पाठमुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात असलेल्या भेंडा गावातील १० पारधी कुटुंबांना गेल्या वर्षभरापासून वाळीत टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. न्यायाच्या अपेक्षेने ५ फेब्रुवारीपासून ५ पीडित कुटुंबे आझाद मैदानात उपोषणास बसली आहेत. मात्र अन्यायाविरोधात लढा देणार्या कुटुंबांची साधी दखल घेण्याची तसदीही सरकारने घेतली नसल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.याप्रकरणी अधिक माहिती देताना पीडित सुभाष काळे यांनी सांगितले की, गावातील किशोर नवले या सवर्ण तरुणाने त्यांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करत जिल्हा न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र खटला मागे घ्यावा, यासाठी सातत्याने कुटुंबियांवर दबाव टाकला जात आहे. गेल्या गेल्या वर्षभरापासून गावाने पारधी समाजाच्या १० कुटुंबांना वाळीत टाकले आहे. तरीही काळे यांनी खटल्यात साक्ष देणार असल्याचे सांगितले.वाळीत टाकल्यानंतरही कुटुंब खटला मागे घेत नसल्याचे पाहून जानेवारी महिन्याच्या १८ तारखेला पीडित मुलीच्या आईला काही जणांनी जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी बाळू ढवळे, विलास ढवळे, आणि छाया ढवळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मारहाणीमुळे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली असल्याचे काळे यांनी सांगितले. भीतीपोटी १० कुटुंबांमधील ५ कुटुंबियांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हलाखीची परिस्थिती असलेल्या उर्वरित पाच कुटुंबांना कोणताही आधार नसल्याचे काळे यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने या कुटुंबाचे पुणे जिल्ह्यातील सुदवाडी गावी पुनर्वसन करावे, अशी पीडित कुटुंबांची मागणी आहे. शिवाय उदरनिर्वाहासाठी काही जमीन द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.....................