शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

धक्कादायक! काँग्रेसच्या आमदाराच्या मुलानं बदनाम करून मोडलं लग्न, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:58 IST

मध्य प्रदेशमधील अलिराजपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्या प्रकरणी ...

मध्य प्रदेशमधील अलिराजपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्या प्रकरणी काँग्रेसचे जोबट विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश पटेल यांचा मुलगा पुष्पराज याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुष्पराज हा सदर तरुणीला मागच्या वर्षभरापासून त्रास देत होता. तसेच तिच्यावर विवाहासाठी दबाव आणत होता. या तरुणीचा दुसऱ्या तरुणाशी साखरपुडा झाल्यानंतर आरोपीने तिला बदमान केले. त्यामुळे तिचं लग्न मोडलं. तसेच या धक्क्यामुळे खचलेल्या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. तसेच आरोपी हा आमदार पुत्र असल्याने त्यावरून राजकारणही सुरू झालं. तसेच भाजपाने काँग्रेस पक्ष हा महिला विरोधी असल्याचा आरोप केला. 

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, मृत तरुणीचं नाव दामिनी ठाकूर होतं. ती नगरपालिकेच्या माजी सीएमओ आशा ठाकूर यांची मुलगी होती. तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जोबट येथील आमदार सेना महेश पटेल यांचा मुलगा पुष्पराज हा त्यांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करायचा. मात्र मुलगी आणि तिचे कुटुंबीय याला विरोध करायचे.  तसेच त्यांनी या मुलीचं लग्नही दुसऱ्या ठिकाणी ठरवून टाकलं होतं. मात्र ही बाब पुष्पराजला समजल्यानंतर त्याने सदर तरुणीची बदनामी केली. या बदमानीमुळे तरुणीचं लग्न मोडलं. तसेच ती घडल्या प्रकारामुळे खचून गेली. तसेच अखेरीस तिने टोकाचं पाऊल उचललं.

मृत तरुणीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, पुष्पराज याने दुसऱ्यांदा त्यांच्या मुलीचं लग्न मोडलं होतं. तत्पूर्वी २०१९ मध्ये या तरुणीचं लग्न गुजरातमध्ये ठरलं होतं. मात्कर आरोपीने तिच्या सासरच्या मंडळींना घाबरवून धमकावून हे लग्न मोडलं. तसेच त्यावेळी त्याने या तरुणीच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला होता. तो तिच्याबरोबर जबरदस्तीने बोलायचा प्रयत्न करायचा. या सर्वामुळे ही तरुणी घाबरून राहायची. 

या घटनेनंतर भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे. तसेच काँग्रेसची महिलांबाबतची मानसिकता घृणित असल्याचा आरोप केला आहे. ही घटना काँग्रेसी नेत्यांच्या घृणित मानसिकता आणि महिलांप्रति विकृत बुद्धीचं उदाहरण आहे, असा आरोप केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाMadhya Pradeshमध्य प्रदेश