शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

धक्कादायक! तरूणाशी बोलताना पाहिलं, वडिलांनी गळाच कापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 11:04 IST

शुक्रवारी सकाळी वडिलांनीच मुलीचा मृतदेह ट्रॉनिका सिटी येथून शोधून काढला.

दिल्ली : राजधानी दिल्लीच्या करावल नगर परिसरात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिच्याच वडिलांना अटक केली आहे. वडिलांनी मुलीला एका तरूणासोबत बोलताना पाहिलं, त्या रागातून त्यांनी तिचा गळा कापून खून केला.  येथील  डीसीपी ए. के. सिंघला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश(40) यांचा करावल नगर परिसरात दूध डेअरीचा व्यवसाय आहे. 7 मार्च रोजी त्यांची मुलगी खाण्यासाठी मोमोज घेऊन येते असं सांगून घराबाहेर पडली. नेहमी  छोट्या भावासोबत बाहेर जाणारी मुलगी आज एकटी गेल्याने वडिलांना संशय आला. संशय आल्यामुळे त्यांनी मुलीचा पाठलाग केला, तर घरापासून थोड्या अंतरावर ती एका तरूणाशी बोलताना दिसली. सुदेश यांना पाहून त्या मुलाने तेथून पळ काढला. पण संतापलेल्या सुदेश यांनी मुलीला गाडीवर बसवून ट्रॉनिका सिटी येथे नेले आणि त्या ठिकाणी चाकून तिचा गळा कापून खून केला. मृतदेह तेथेच खड्ड्यात फेकून आरोपी सुदेश घरी परतला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात केली. पोलिसांनी जवळपासचे सीसीटीव्ही तपासले पण काही हाती लागलं नाही. अखेर शुक्रवारी सकाळी वडिलांनीच मुलीचा मृतदेह ट्रॉनिका सिटी येथून शोधून काढला. त्यानंतर पोलिसांनी आणखी कसून तपास केला आणि सीसीटीव्हीमध्ये मुलगी एका गाडीवर जाताना दिसली. ती गाडी आणि हेल्मेट मुलीच्या वडिलांच्या गाडीप्रमाणेच दिसत होते. संशय आल्यामुळे पोलिसांनी वडिलांकडे कसून चौकशी केली आणि त्याने घडलेली घटना कथन केली.   त्या मुलाचा खून करायचा होता -अनेकदा मुलीला त्या तरूणाशी बोलू नकोस असं समजावलं होतं, मला त्याच्याशी तिचं बोलणं आवडत नव्हतं. त्यादिवशी ती पुन्हा त्याच तरूणाला भेटायला गेल्याचा मला संशय आला त्यामुळे रागात मी चाकू घेऊन गाडीवर घराबाहेर पडलो. मला त्या मुलाचा खून करायचा होता , पण मुलगा पळून गेला. (फोटो क्रेडिट - द हिंदू)  

टॅग्स :Crimeगुन्हाNew Delhiनवी दिल्लीMurderखूनArrestअटक