शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दुकानातील कुरकुरे, बिस्किटं चोरली, चार अल्पवयीनांना खांबाला बांधले, बेदम मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 20:23 IST

Crime News: बिहारमधील बेगुसराय येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे चार अल्पवयीन मुलांना दुकानातील कुरकुरे आणि बिस्किट चोरली म्हणून बेदम मारहाण करण्यात आली.

बिहारमधील बेगुसराय येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे चार अल्पवयीन मुलांना दुकानातील कुरकुरे आणि बिस्किट चोरली म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. मुलांना केवळ मारहाणच करण्यात आली नाही तर त्यांना तासनतास खांबाला बांधून ठेवण्यात आले. यादरम्यान, कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला.

ही घटना २८ ऑक्टोबर रोजी वीरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फाजिलपूर येथे घडली आहे. दरम्यान एसपींच्या आदेशावरून आरोपी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी चार मुलांनी एका किराणा दुकानात शिरून बिस्किटे आणि कुरकुरे चोरले. यादरम्यान, चारही जणांना दुकानदाराने पकडले. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या डोळ्यंवर पट्टी बांधून ठेवण्यात आली.

धक्कादायक बाब म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना बघ्याची भूमिका घेत पाहत राहणे पसंत केले. कुणीही या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र तिथे असलेल्या कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढला आणि हाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.  दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या मुलांची सुटका करून त्यांना पोलीस ठाण्यात नेले. किरकोळ चौकशी नंतर या मुलांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

याबाबत एसपी योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, दुकानदाराने चार मुलांना चोरी करताना पकडले. या प्रकरणी एसपी योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, दुकानदारने मुलांना चोरी करताना रंगेहात पकडले. त्यानंतर या मुलांना मारहाणा करण्यात आली. तसेच खांबाला बांधण्यात आले, असे तपासामध्ये समोर आले आहे. पोलिसांनी मुलांच्या आईवडिलांशी संपर्क साधला. तसेच त्यांना लेखी तक्रार देण्यास सांगितले. मात्र अद्याप कुणीही तक्रार दिलेली नाही.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार