शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

धक्कादायक! प्रेमभंग झाला म्हणून पूर्वप्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर केले अपलोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 09:05 IST

प्रेमसंबंध तुटले म्हणून संतापलेल्या प्रियकराने पूर्वप्रेयसीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना बंगळुरुमध्ये समोर आली आहे.

ठळक मुद्देकाही कारणांवरुन वाद झाल्यामुळे पीडित तरुणीने रिलेशनशिप कायम ठेवायला नकार दिला. पूर्वप्रेयसीबरोबर प्रणयाच्या क्षणाचेही काही फोटो काढले होते.

बंगळुरु - प्रेमसंबंध तुटले म्हणून संतापलेल्या प्रियकराने पूर्वप्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना बंगळुरुमध्ये समोर आली आहे. शौविक भवन (22) असे आरोपीचे नाव असून बंगळुरु पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शौविक मॅनेजमेंटच्या दुस-या वर्षाचा विद्यार्थी आहे. शौविक आणि पीडित तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. काही कारणांवरुन वाद झाल्यामुळे पीडित तरुणीने रिलेशनशिप कायम ठेवायला नकार दिला. 

पण शौविकला हा नकार पचवता आला नाही. त्याने सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाऊंटवर पूर्वप्रेयसीचे न्यूड फोटो पोस्ट केले. शौविक आसाम तेजपूरचा राहणारा आहे. त्याने पूर्वप्रेयसीबरोबर प्रणयाच्या क्षणाचेही काही फोटो काढले होते. संबंध कायम ठेवले नाहीस तर, प्रणयाच्या क्षणाचे काढलेले फोटो तेजपूरमध्ये व्हायरल करीन अशी धमकी त्याने दिली होती. शौविकने इन्स्टाग्रामवर पूर्वप्रेयसीचे न्यूड फोटो अपलोड केले तेव्हा त्याखाली शरीरविक्रीय करणारी महिला असा तिचा उल्लेख करुन तिचा मोबाईल नंबर दिला होता अशी माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. 

पीडित तरुणीला जेव्हा मित्र-मैत्रिणींकडून तिचे असे फोटो सोशल मीडियावर अपलोड झाल्याचे समजले. तेव्हा तिने थेट पोलीस स्टेशन गाठून शौविक विरोधात तक्रार दिली. शौविकच्या या कृत्यामुळे रेट किती अशी विचारणा करणारे अनेक फोन तिला आले. पीडित तरुणी मुंबई येथील कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएटचे शिक्षण घेत आहे. शौविकने पीडित तरुणीचे जवळपास 20 न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. शौविक पीडित तरुणीला भेटायला मुंबईला जात असताना बंगळुरु एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. 

टॅग्स :Molestationविनयभंग