शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! 14 ते 18 वर्षे वयोगटातील एक चतुर्थांश मुलांना धडपणे वाचता येत नाही मातृभाषेतील मजकूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 21:22 IST

आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या आणि 14 ते 18 वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात मुले मोबाइल फोन व्यवस्थित वापरता येतो.

नवी दिल्ली - आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या आणि 14 ते 18 वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात मुले मोबाइल फोन व्यवस्थित वापरता येतो. मात्र या दहा मुलांपैकी एक चतुर्थांश मुलांना आपल्या मातृभाषेतील मजकूर धडपणे वाचता येत नाही, असा निष्कर्ष अ‍ॅन्युएल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर)च्या 2017च्या अहवालात काढण्यात आला आहे.देशातल्या 24 राज्यांतील 24 जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर हा अहवाल तयार करण्यात आला. सुमारे दोन हजार स्वयंसेवकांनी 35 संस्थांच्या मदतीने 1641 गावांतील 25 हजार घरांना सर्वेक्षणासाठी भेटी दिल्या व 30 हजार मुलामुलींशी त्यांनी संपर्क साधून त्यांची शैक्षणिक स्थिती जाणून घेतली. ही मुले काय करतात, त्यांची क्षमता, जागरुकता, त्यांची ध्येय अशा चार मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून हे सर्वेक्षण करण्यात आले. असर अहवाल 2017 हा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. ग्रामीण भागातील शिक्षणाचा कसा बोजवारा उडालेला आहे हे असर 2017च्या अहवालातील निष्कर्षांनी दाखवून दिले आहे.वयाच्या 14व्या वर्षी शाळेत किंवा कॉलेजमध्ये पटनोंदणी न झालेल्या मुलांची संख्या 5 टक्के आहे. तर 18 वर्षांच्या मुलांचे याबाबतीतले प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. शिक्षण हक्क कायदा 2009 हा अमलात आल्यानंतरच्या लगेचच जी मुले आठवी इयत्ता उत्तीर्ण झाली अशा 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक स्थितीबाबत हा अहवाल भाष्य करतो. 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, असे शिक्षण हक्क कायद्यामध्ये म्हटले आहे.असर 2017च्या अहवालात म्हटले आहे की, 14 ते 18 वर्षे वयोगटातील 25 टक्के मुले आपल्या मातृभाषेतील मजकूर धडपणे वाचू शकत नाहीत. 14 वर्षे वयोगटातील 53 टक्के मुले इंग्रजी वाक्ये वाचू शकतात. 14 वर्षे असो किंवा 18 वर्षे वयोगटातील मुलांना गणिताचे सामान्य ज्ञानही नसते. 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना वित्तसंस्था, प्रसारमाध्यमे, डिजिटल वर्ल्ड याविषयी किती माहिती असते याची पडताळणी केली असता त्यातील 73 टक्के मुलांनी मोबाइल फोनचा व्यवस्थित वापर केल्याचेही आढळून आले. मात्र 12 टक्के मुलांनी मोबाइल आजवर कधीच वापरलेला नाही तर मुलींमध्ये हेच प्रमाण 23 टक्के इतके आहे.

टॅग्स :MobileमोबाइलStudentविद्यार्थी