शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ओला कॅबमध्ये महिलेला ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार, 6 संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 13:01 IST

ग्रेटर नोएडा येथे शुक्रवारी ओला कॅबमध्ये महिलेबरोबर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. नोएडा इथल्या कंपनीत काम करणा-या एका महिलेनं ओला कॅबचालकासह त्याच्या साथीदारांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली- ग्रेटर नोएडा येथे शुक्रवारी ओला कॅबमध्ये महिलेबरोबर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. नोएडा इथल्या कंपनीत काम करणा-या एका महिलेनं ओला कॅबचालकासह त्याच्या साथीदारांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. सुरजपूर येथे जाण्यासाठी त्या महिलेनं सेक्टर 37 येथून कॅब बुक केली होती. कॅबमध्ये महिला बसल्यानंतर काही वेळानं कॅबचालकाचे मित्रही कॅबमध्ये बसले आणि त्यांनी महिलेला जबरदस्ती दारू पाजण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्या ओला कॅब चालकानं स्वतःच्या साथीदाराबरोबर मिळून त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला.या प्रकरणात पोलिसांनी कॅबचालकाच्या भावासह 6 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. हा प्रकार कोतवाली भागातील दयानगर येथे घडला आहे. पीडित महिलेनं सांगितलं की, कॅबचालक आणि त्याच्याबरोबर कॅबमध्ये असलेल्या लोकांनी मला दारू पाजण्याचा प्रयत्न केला, पण मी विरोध केल्यानंतर त्या कॅबचालकानं दयानगर गावाजवळील जंगलात जाऊन गाडी थांबवली. तिथेच तिच्यावर कॅबचालक आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत महिला दयानगर गावात दाखल झाली. त्यानंतर गावक-यांनी तिला मदत केली. महिलेनं फोन करून पोलिसांना बोलावलं आणि सर्व प्रकार सांगितला. सध्या कॅबचालक हा मुख्य आरोपी फरार आहे. पोलिसांनी आरोपीचे काका आणि भावासह 6 लोकांना ताब्यात घेतलं असून, महिलेला मेडिकल तपासणीसाठी पाठवलं आहे.तर मंगळवारी(24 एप्रिल)ला ग्रेटर नोएडातल्या एका नावाजलेल्या खासगी शाळेत 11वीच्या विद्यार्थिनीवरही चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. विद्यार्थिनीला 3 तरुणांनी धावत्या कारमध्ये ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींमध्ये एक मुलगा तिच्या वर्गातील असून, तर आरोपी त्याचे नातेवाईक आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगRapeबलात्कारNew Delhiनवी दिल्ली