शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आसाममध्ये गेल्या चोवीस तासात 8 नवजात अर्भकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 08:59 IST

आसामच्या फकरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत तब्बल ८ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे आसामच्या फकरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत तब्बल ८ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  दोन ते चार दिवसांची पाच नवजात अर्भक बुधवारी रात्री दगावली होती.

गुवाहाटी- आसामच्या फकरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत तब्बल ८ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवार रात्रीपासून हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं आहे.  दोन ते चार दिवसांची पाच नवजात अर्भक बुधवारी रात्री दगावली होती. तर इतर तीन जणांचा गुरुवारी मृत्यू झाला. पण आश्चर्याची बाब म्हणजे एकाच हॉस्पिटलमध्ये इतक्या मोठ्या संख्येने नवजात अर्भकांचा मृत्यू होऊनही हॉस्पिटल प्रशासनाने याची जबाबदारी झटकली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टरांची आणि हॉस्पिटलमधील स्टाफची बाजू घेत यात त्यांच्याकडून दृर्लक्ष किंवा चूक न झाल्याचं म्हटलं आहे. बाळ जन्मला आल्यावर त्याचं वजन कमी असल्याने मृत्यू झाला, असं कारण हॉस्पिटल प्रशासनाने दिलं आहे.

बाळाचं जन्मावेळी वजन कमी असणं हे त्याच्या मृत्यूमागील महत्वाचं कारण असतं. या आठ नवजात अर्भकांच्या मृ्त्यूंमागेही हेच कारण असून त्यात डॉक्टरांचा दोष नाही. मृत्यू झालेल्या सर्व मुलांना नवजात गर्भधारणा देखभाल युनिट (एनआयसीयू) मध्ये ठेवण्यात आलं होतं. यातील काही बालकांचं वजन अडीच किलो इतकं होतं. तर एका बाळाचं वजन हे फक्त एक किलो इतकं होतं, असं या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य तसंच हॉस्पिटलचे मुख्य अधीक्षक डॉ. दिलीप कुमार दत्ता यांनी सांगितले आहे. 

हॉस्पिटलमध्ये दररोज याच कारणामुळे एक ते दोन नवजात अर्भकांचे मृत्यू होतच असतात, असं ही दत्ता यांनी सांगितलं. बुधवारी आणि गुरुवारी या संख्येत वाढ झाल्याने याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर राज्याच्या आरोग्यमंत्री हिमंता बिस्वास शर्मा यांनी या घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तसंच वैद्यकीय शिक्षण संचालकांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

ऑगस्ट महिन्यात उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी 30 मुलांचा मृत्यू झाला होता. सगळ्यांनाच हादरविणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आसाममधील या घटनेची चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य