शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

धक्कादायक! कोरोना पसरण्याच्या भितीने IRS शिवराज सिंहांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 8:03 AM

शिवराज सिंह हे 2006 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी होते. ते द्वारका सेक्टर ६ मधील सन्मती अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांची ड्यूटी आर के पूरमच्या आयकर विभागात होती.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात 9 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यामध्ये जे लोक कोरोनाच्या भितीमुळे जगू शकले नाहीत त्यांचा समावेश नाहीय. म्हणजेच कोरोनाच्या भितीने आत्महत्या करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. असेच एक प्रकरण दिल्लीमध्ये घडले आहे. भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्याने  आत्महत्या केली आहे. 

इंडियन रेव्हेन्यू सर्विस ऑफिसर शिवराज सिंह असे त्यांचे  नाव असून ते आयकर विभागामध्ये अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कारमध्ये अॅसिडसारखा पदार्थ प्राशन करून  जीवन संपवले. त्यांच्या कारमध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी 'माझ्यापासून कुटुंबाला कोरोनाची लागण होईल, त्यांना कोरोना देऊ शकत नाही. यामुळे आत्महत्या करत आहे.''  असे लिहिले आहे. 

एका आठवड्यापूर्वीच त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र, रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, तरीही त्यांना भिती वाटत होती की त्यांच्यामुळे कुटुंबाला कोरोनाची लागण होईल, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक तपासात त्यांनी अॅसिड पिल्याने मृत्यू झाल्याचे दिसत आहे. ते सध्याच्या परिस्थितीमुळे खूप निराश झाले होते. पोस्टमार्टेम केल्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला. 

आयआरएस अधिकारीशिवराज सिंह हे 2006 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी होते. ते द्वारका सेक्टर ६ मधील सन्मती अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांची ड्यूटी आर के पूरमच्या आयकर विभागात होती. रविवारी सायंकाळी घराच्या बाहेर कार उभी करत त्यांनी आत्महत्या केली. यानंतर शरीर जळायला लागले तेव्हा ते कारमधून बाहेर आले आणि सारे कपडे काढून फेकायला लागले. अपार्टमेंटच्या गार्डने य़ाची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यांनी हॉस्पिटलमध्ये हलविले मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.

अन्य महत्वाच्या बातम्या....

वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSuicideआत्महत्याIncome Taxइन्कम टॅक्स