ओम पुरी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती
By Admin | Updated: January 10, 2017 00:15 IST2017-01-10T00:15:01+5:302017-01-10T00:15:01+5:30
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

ओम पुरी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये पुरी यांच्या डोक्यामध्ये इजा झाल्याचे निशाण तसेच मानेजवळील हाड आणि हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ओम पुरी यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे. यानुसार पुरी यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूस दीड इंच खोल आणि 4 सेंटीमीटर लांब जखम आहे. तसेच मानेजवळील हाड आणि हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. याबाबत ओशिवारा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष खानविलकर म्हणाले, या प्रकरणाचा आम्ही सर्वबाजुंनी तपास करत आहोत. पुरी ज्या इमारतीत राहात होते तेथील सीसीटीव्ही फूटेज आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचीही चौकशी करत आहोत. मृत्यूपुर्वीच्या 24 तासात पुरी ज्या व्यक्तिंना भेटले त्यांचीही चौकशी करत आहोत असं ते म्हणाले.
ओम पुरी यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका व्यक्त करण्यात येत होत्या. शुक्रवारी ओम पुरी आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं.