धक्कादायक ! गृहपाठ केला नाही म्हणून मुलींना अर्धनग्न करुन शाळेत फिरवले
By Admin | Updated: February 7, 2017 18:04 IST2017-02-07T18:04:30+5:302017-02-07T18:04:30+5:30
गृहपाठ पुर्ण केला नाही म्हणून आठवी इयत्तेतील विद्यार्थिनींना अर्धनग्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे

धक्कादायक ! गृहपाठ केला नाही म्हणून मुलींना अर्धनग्न करुन शाळेत फिरवले
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 7 - गृहपाठ पुर्ण केला नाही म्हणून आठवी इयत्तेतील विद्यार्थिनींना अर्धनग्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशमधील सोनभद्रा परिसरात असलेल्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. शिक्षिका मीना सिंग यांनी हा लाजिरवाणा प्रकार केला आहे. गर्ल्स ज्युनिअर हायस्कूलमध्ये शनिवारी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार शिक्षिका मीना सिंग यांनी गृहपाठ न केल्याबद्दल मुलींना शिक्षा सुनावत अर्धनग्न केलं. इतकंच नाही तर त्यानंतर शाळेच्या आवारात त्यांची धिंडही काढली. तब्बल दोन तास हा प्रकार चालू होता. यावेळी मोबाईल फोनमध्ये मुलींचे फोटो आणि व्हिडीओही काढण्यात आले. जर का गृहपाठ पुर्ण केला नाही तर हे फोटो, व्हिडीओ लीक करेन अशी धमकीच मीन सिंग यांनी विद्यार्थिनींना दिली.
मुलींच्या पालकांना माहिती मिळतात त्यांनी जिल्हा दंडाधिका-यांकडे धाव घेत कारवाई करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिका-यांनी मीना सिंग यांचं निलंबन केलं. चौकशी अद्याप सुरु आहे.