शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हायव्होल्टेज तार अंगावर पडली; तरुणासह दोन चिमुकल्या मुलींचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 21:07 IST

बाप-लेकीसह 9 वर्षीय भाचीचा जागीच मृत्यू

UP Accident : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये रविवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. येथील सोनबरसा बाजारात हायव्होल्टेज तार धावत्या दुचाकीवर पडली, ज्यामुळे दुचाकीवरील तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला आहे. 

दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यूपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 24 वर्षीय तरुणासह नऊ आणि दोन वर्षीय मुलींचा मृत्यू झाला आहे. एम्स पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी लोकांना समज देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः दखल घेतली आणि  जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. 

तारेमध्ये 11 हजार व्होल्ट करंटया घटनेत शिवराज निषाद(24), त्याची दोन वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांची भाची, यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांवर तब्बल 11000 व्होल्टची लाईन पडल्याने, तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घटनास्थळी उपस्थितांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र मदत पोहोचेपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नागरिकांनी विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत घटनास्थळी चांगलाच गोंधळ घातला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfireआगelectricityवीज