धक्कादायक ! तृतीयपंथीयांनी कापले तरुणाचे गुप्तांग

By Admin | Updated: March 8, 2017 17:32 IST2017-03-08T17:32:31+5:302017-03-08T17:32:31+5:30

एका 20 वर्षीय तरुणाला घरी बोलावून त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमागे तृतीयपंथीय असल्याचे बोलले जात आहे.

Shocking The genitals of a young man cut by the third-man | धक्कादायक ! तृतीयपंथीयांनी कापले तरुणाचे गुप्तांग

धक्कादायक ! तृतीयपंथीयांनी कापले तरुणाचे गुप्तांग

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8 - एका 20 वर्षीय तरुणाला घरी बोलावून त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमागे तृतीयपंथीय असल्याचे बोलले जात आहे. दोन तृतीयपंथीयांनी पीडित तरुणाला घरी बोलावून त्याच्या चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध केले. 
 
दुस-या दिवशी शुद्धीवर आल्यानंतर गुप्तांगच नसल्याचे पाहून या पीडित तरुणाला जबर धक्काच बसला. या तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण स्वामी श्रद्धानंद कॉलनी येथे कुटुंबीयांसोबत राहतो. जहांगीरपुरी येथील आरती आणि तमन्ना नावाच्या तृतीयपंथीयांनी घरी जागरणाचा कार्यक्रमासाठी त्याला आमंत्रण दिले होते. कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारुन तरुण संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचला.
 
यावेळी 4 ते 5 तृतीयपंथीयांनी त्याला खुर्चीवर बसवले, त्यानंतर 'जागरण' कार्यक्रमासंदर्भात बोलणी करता करता त्याला चहा पाजली. चहा प्यायल्यामुळे गुंगी येऊन तो जागीच बेशुद्ध झाला. दुस-या दिवशी सकाळी शुद्ध आली तेव्हा एका वेगळ्या ठिकाणी असल्याचे त्याच्या लक्षात आले. धक्कादायक म्हणजे त्याचे गुप्तांगच नसल्याचे त्याच्या लक्षात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Shocking The genitals of a young man cut by the third-man