धक्कादायक! धावत्या गाडीमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: June 20, 2017 09:59 IST2017-06-20T09:41:13+5:302017-06-20T09:59:54+5:30

महिलेचे अपहरण करुन धावत्या गाडीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Shocking Gang rape in a moving car | धक्कादायक! धावत्या गाडीमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक! धावत्या गाडीमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

 ऑनलाइन लोकमत

गुरगाव, दि. 20 - दिल्ली, हरयाणा ही राज्ये महिलांसाठी अजूनही सुरक्षित नसून, बलात्कार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही इथे महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाहीत. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण ताजी करुन देणारी एक घटना समोर आली आहे. हरयाणातील गुरगाव येथून महिलेचे अपहरण करुन धावत्या गाडीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर आरोपींनी पीडित महिलेला ग्रेटर नोएडाजवळ गाडीतून बाहेर फेकून दिले. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. 
 
पीडित महिला राजस्थान भारतपूर येथे राहणारी असून, ती सोहना येथे आपल्या एका नातेवाईकाकडे आली होती.  पीडित महिलेला गाडीबाहेर फेकले तेव्हा ती बेशुद्धा अवस्थेत होती. रस्त्यावरुन जाणा-या एका महिला वाटसरुला पीडित महिला रस्त्यावर पडलेली दिसली तिने लगेच पोलिसांना माहिती दिली. 

आणखी वाचा 
 
पीडित महिलेला रुग्णालयात आणले तेव्हा ती गंभीर अवस्थेत होती. प्रथमोपचारानंतर लगेच तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली. आमचे एक पथक हरयाणातील सोहना येथे रवाना झाले आहे अशी माहिती गौतम बुद्ध नगरचे एसएसपी लव कुमार यांनी दिली. हरयाणा पोलिसांनी तपास सुरु केला असून, अजून एफआयआर दाखल झालेला नाही. 
 
 

Web Title: Shocking Gang rape in a moving car