धक्कादायक ! SBI एटीएममधून निघालेल्या 500च्या नोटांवरचे गांधी गायब
By Admin | Updated: April 30, 2017 14:21 IST2017-04-30T11:31:24+5:302017-04-30T14:21:32+5:30
नोटाबंदीनंतर अनेकदा एटीएममधून बनावट नोटा बाहेर आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

धक्कादायक ! SBI एटीएममधून निघालेल्या 500च्या नोटांवरचे गांधी गायब
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - नोटाबंदीनंतर अनेकदा एटीएममधून बनावट नोटा बाहेर आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या तरी असे प्रकार थांबल्याचं दिसत असतानाच असाच एक प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. मोरेना जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका एटीएममधून गांधींचा फोटो नसलेल्या 500च्या नोटा बाहेर आल्या आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी मोरेनामध्ये एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ पोहोचले. जेव्हा त्यांनी एटीएममधून पैसे काढले तेव्हा 500च्या नोटा एटीएममधून बाहेर आल्या. मात्र नोट पाहून ती व्यक्ती आश्चर्यचकित झाली. जी नोट एटीएममधून आली त्यावर नंबर होते. मात्र एटीएममधून निघालेल्या नोटांवरून गांधीजींचे फोटो गायब होते. एटीएममधून बाहेर आलेल्या 500च्या चार नोटांवरून चक्क गांधीजींचे फोटो नसल्याचंही पाहून आजूबाजूचे लोकही अचंबित झाले. त्यामुळे एटीएम असलेल्या परिसरात एकच खळबळ उडाली.
मात्र यानंतर याची तक्रार बँकेकडे करण्यात आली आहे. बँक प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा एटीएममध्ये कशा याला याचा बँकेचे कर्मचारी शोध घेत आहेत. याआधीही मध्य प्रदेशमधल्या दमोह जिल्ह्यात असा प्रकार समोर आला आहे. त्यावेळीही एटीएममधून नंबर नसलेल्या 500च्या नोटा बाहेर आल्या होत्या. नंबर नसलेल्या या नोटाही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून बाहेर आल्या होत्या. त्यानंतर ती एटीएम मशिन बंद करण्यात आलं होतं.