ओडिशातील देवगड जिल्ह्यात बुधवारी रात्री अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गरियापाली गावात किरकोळ घरगुती वादातून एका वृद्ध व्यक्तीने आपल्या पत्नीसह, सून आणि अवघ्या चार वर्षांच्या नातीची हातोड्याने ठेचून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गरियापाली गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस सध्या शेजाऱ्यांकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ११:३० च्या सुमारास आरोपी रमेश गरिया याचे त्याची पत्नी गुल गरिया हिच्याशी जोरदार भांडण झाले. या भांडणातून रमेशने गुल यांच्यावर हातोड्याने हल्ला केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सून लिपी महाकुल हिच्या खोलीकडे मदतीसाठी धावली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या रमेशने तिथे जाऊन दोघींवरही हातोड्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. एवढ्यावरच न थांबता, रमेशने आपली चार वर्षांची नात ईशानी हिच्यावरही हातोड्याने हल्ला केला आणि तिथून पळ काढला.
रमेशचा मुलगा धीरेन गरिया हा जेव्हा घरी परतला, तेव्हा त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आपले कुटुंब दिसले. त्याने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच देवगडचे एसपी अनिल मिश्रा यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणावर बोलताना देवगडचे एसपी अनिल मिश्रा म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वाद हेच या हत्येमागचे मुख्य कारण असल्याचे दिसत आहे. आरोपीने हत्येसाठी हातोड्याचा वापर केला आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फॉरेन्सिक टीमद्वारे पुरावे गोळा केले जात आहेत.
Web Summary : In Odisha, a man murdered his wife, daughter-in-law, and granddaughter with a hammer following a family dispute. The accused is absconding, and police are investigating. Family feud appears to be the motive.
Web Summary : ओडिशा में पारिवारिक विवाद के बाद एक व्यक्ति ने अपनी पत्नी, बहू और पोती की हथौड़े से हत्या कर दी। आरोपी फरार है और पुलिस जांच कर रही है। पारिवारिक कलह ही हत्या का कारण बताया जा रहा है।