धक्कादायक ! केरळमध्ये कुत्र्यावर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 13:00 IST2016-02-19T12:30:23+5:302016-02-19T13:00:21+5:30
प्राणीमित्र संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे कुत्र्यावर बलात्कार करत असतानाचा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली

धक्कादायक ! केरळमध्ये कुत्र्यावर बलात्कार
>ऑनलाइन लोकमत -
कोच्ची - दि. 19 - केरळच्या कोच्चीमध्ये चक्क कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. प्राणीमित्र संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे कुत्र्यावर बलात्कार करत असतानाचा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली.
ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया या प्राणीमित्र संघटनेने या व्यक्तीची माहिती देणा-याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. बलात्कार करणारी व्यक्ती मल्याळम भाषेत बोलत असल्याने हा व्हिडिओ केरळचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये कुत्र्यावर जबरदस्तीने बलात्कार केला जातोय हे स्पष्ट दिसतं आहे. कुत्रा स्वताची सुटका करुन घेण्याच प्रयत्नदेखील करत असल्याचंदेखील दिसत आहे. पोलीस सध्या या व्यक्तीचा शोध घेत आहेत.