बेलफास्ट : जगाला टायटॅनिक नावाचे महाकाय जहाज देणाऱ्या आयर्लंडमध्ये खळबळ माजली आहे. हार्लेंड अँड वोल्फ शिपयार्ड ही तब्बल 158 वर्षे जुनी कंपनी आज बंद झाली आहे. या कंपनीमध्ये 100 वर्षांपूर्वी 35 हजार कर्मचारी काम करत होते. धक्कादायक म्हणजे ही कंपनी बंद झाली त्या दिवशी केवळ 123 कर्मचारी राहिले होते. सोमवारी ही कंपनी बंद करण्यात आली.
टायटॅनिक या महाकाय जहाजाची कथा साऱ्यांनाच माहिती आहे. या जहाजामुळे ही कंपनी चर्चेत आली होती. कधीही न बुडणारे जहाज अशी या जहाजाची ओळख करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच फेरीमध्ये हिमनगाला आदळल्याने हे जहाज बुडाले होते आणि हजारो लोकांना जलसमाधी मिळाली होती. हे जहाज 31 मार्चस 1911 मध्ये लाँच करण्यात आले होते. या जहाजाची बांधणी बेलफास्टमध्ये 1909 ते 1911 या काळात झाली होती.
हार्लेंड अँड वोल्फ शिपयार्ड कंपनीने एप्रिल 1912 मध्ये तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा टायटॅनिक बुडाले होते. या दुर्घटनेत 1517 लोक ठार झाले होते. हे जहाज साऊथम्पटन बंदरावरून न्यूयॉर्कसाठी रवाना झाले होते. टायटॅनिकचे अवशेष 1 सप्टेंबर 1985 मध्ये शोधण्यात आले होते. प्रथम जहाजाची स्थिती गुप्त ठेवण्याची योजना होती कारण जहाज बुडाल्याची जागा कोणाला माहिती होऊ नये असा यामागे उद्देश होता. या जागेला दफनभूमी म्हटले जात होते.