शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा केंद्र सरकारला माहीतच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 20:15 IST

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना हमीभाव, अच्छेदिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती किती जागरूक आहे याचा धक्कादायक खुलासा खुद्द कृषीमंत्र्यांनीच आज केला. महाराष्ट्रासह इतर राज्यांत हजारावर शेतकरी आत्महत्या करत असताना गेल्या तीन वर्षांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याची कल्पना नसल्याचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत सांगितले आहे.

आत्महत्यांबाबत केंद्र सरकारला नॅशनल क्राइम ब्यूरो (एनसीआरबी) ही संस्था माहिती पुरविते. हीच संस्था आत्महत्यांची माहिती गोळा करते. 2016 नंतर या संस्थेने कोणतीही माहिती जाहीर केलेली नसल्याचा खुलासा सिंह यांनी केला. 

तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. त्रिवेदी यांनी 2016 पासून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि सरकारने त्यांच्या कुटुंबियांना काय मदत केली, असा प्रश्न विचारला होता. 

राधामोहन सिंह यांनी लिहून दिलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे की, गृह मंत्रालयांतर्गत एनसीआरबी आत्महत्यांची माहिती एकत्र करून जाहीर करते. मात्र, त्यांच्या वेबसाईटवरच 2015 पर्यंतचे आकडे आहेत. त्यांनी 2016 नंतरचे आकडेवारी अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. एनसीआरबीनुसार 2015 मध्ये 8 हजार शेतकऱ्यांनी तर 4500 हजार शेतमजुरांनी आत्महत्या केली आहे. महाराष्ट्राचा यामध्ये पहिला क्रमांक लागत असून 3000 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर तेलंगाना 1358 आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याParliamentसंसद