शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

धक्कादायक! Redmi नंतर आता 'या' कंपनीचा फोन फुटला, 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:41 IST

मोबाईल फोन ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत, आता ताज्या घटनेत एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.

बरेली: मोबाईल फोन चार्जिंग करताना फोनवर बोलू नका, फोन प्रमाणापेक्षा जास्त चार्ज करु नका, असे अनेकदा आवाहन केले जाते. पण, अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोबाईल स्फोटच्या घटना घडतात. यात अनेकदा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये घडली आहे. पण, या घटनेत अवघ्या 8 महिन्यांच्या चिमुकलीला आपलाजीव गमवावा लागला आहे. ही घटना मोबाईल चार्जिंग दरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे. 

अतिचार्जिंगमुळे मोबाईल गरम झालामिळालेल्या माहितीनुसार, सोलर पॅनलद्वारे मोबाईल चार्ज केला जात होता. यादरम्यान फोनची बॅटरी अति चार्ज होऊन गरम झाली आणि फोनचा स्फोट झाला. फोनचा स्फोट झाला तेव्हा शेजारी बसलेली 8 महिन्यांची मुलगी गंभीररित्या भाजली गेली. कुटुंबीयांनी तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले, पण डॉक्टर त्या चिमुकलीचा जीव वाचवू शकले नाही.

लावा कंपनीचा होता मोबाईलमोबाईल स्फोटाची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकदा चार्जिंगदरम्यान स्फोट झाल्याच्या बातम्या घडल्या आहेत. अलीकडेच एका YouTuber ने आरोप केला होता की, Redmi 6A च्या स्फोटामुळे त्याच्या मावशीचा मृत्यू झाला. याबाबत त्यांने कंपनीकडून उत्तर मागितले आहे. दरम्यान, बरेलीमध्ये घडलेली घटना लावा कंपनीच्या फोनची आहे. या प्रकरणाची चौकशी करत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. तसेच, पीडित कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे कंपनीने सांगितले आहे. 

मोबाईल का ब्लास्ट होतात?स्मार्टफोनमध्ये लिथियम आयन (Lithium Ion) बॅटरी वापरली जाते. स्मार्टफोनचा स्फोट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची बॅटरी. काहीवेळा  एक्स्टर्नल फोर्समुळे बॅटरीचा स्फोट होतो, तर काहीवेळा सदोष युनिटमुळेही होतो. याशिवाय चार्जिंग दरम्यान काही चुकांमुळे बॅटरीचा स्फोटही होऊ शकतो. स्मार्टफोनचा स्फोट झाल्यावर कंपन्या सामान्यतः ग्राहकांना दोष देतात. कारण ग्राहकाने मूळ चार्जर वापरला नाही, असे त्यांचे म्हणणे असते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMobileमोबाइलBlastस्फोटBabys Day Outबेबीज डे आऊट