तेलंगणाच्या नागरकर्णूल जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात (KGBV) इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने स्कॅनिंग सेंटरच्या बाथरुममध्ये एका मुलाला जन्म दिला. मात्र, सामाजाची भीती आणि लोक लज्जेला घाबरून तिने आपल्या आईच्या मदतीने नवजात बाळाला कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. हे दृश्य पाहून घटनास्थळी असलेले कर्मचारी घाबरले आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली.
नेमकं काय घडलं? कसं घडलं? -मिळालेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी सोमवारी आपली परीक्षा देऊन घरी परतली. घरी पोहोचताच तिला तीव्र पोटदुखी सुरू झाली. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला स्कॅनिंगसाठी नेण्यात आले. तेथे पोहोचल्यानंतर, बाथरुममध्येच तिची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने माय-लेकीने मिळून त्या निष्पाप जीवाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडून दिले. हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.
'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत संभाव्य लैंगिक शोषणाचा तपास सुरू -माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बाळ आणि त्याच्या आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ही विद्यार्थिनी एका गरीब कुटुंबातील असून सरकारी निवासी शाळेत शिक्षण घेते. पोलिसांनी या प्रकरणात पितृत्वाची तपासणी सुरू केली असून, 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत संभाव्य लैंगिक शोषणाचा तपास केला जात आहे.
Web Summary : In Telangana, a 16-year-old student gave birth in a bathroom and, with her mother's help, abandoned the newborn in a trash can due to fear of social stigma. Police are investigating potential sexual assault under POCSO.
Web Summary : तेलंगाना में, एक 16 वर्षीय छात्रा ने बाथरूम में बच्चे को जन्म दिया और सामाजिक कलंक के डर से अपनी माँ की मदद से नवजात शिशु को कचरे के डिब्बे में छोड़ दिया। पुलिस पॉक्सो के तहत संभावित यौन उत्पीड़न की जांच कर रही है।