शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तिरुपती येथील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 07:19 IST

ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने व्हेंटिलेटवर असलेल्या 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये, 9 रुग्ण कोविड पॉझिटीव्ह होते, तर 3 रुग्ण नॉन कोविड उपचार घेत होते.

ठळक मुद्देघटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले होते. आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे आणि रुग्णालयाकडे पुरेसा ऑक्सिजनचा साठा आहे.

चित्तूर - आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे ऑक्सीजनचा पुरवठा खंडीत झाल्याने तब्बल 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथील एसव्हीआर रुईया सरकारी रुग्णालयात सोमवारी रात्रीच्या सुमारासा ही दुर्घटना घडली. त्यामध्ये, 11 जणांचा मृत्यू झाला असून इतर 5 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्यानेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने व्हेंटिलेटवर असलेल्या 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये, 9 रुग्ण कोविड पॉझिटीव्ह होते, तर 3 रुग्ण नॉन कोविड उपचार घेत होते. चेन्नईहून ऑक्सिजन टँकर तिरुपतीच्या दिशेने रवाना झाला. पण हा ऑक्सिजिन टँकर वेळेत पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांना तातडीने ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला, अशी माहिती चित्तूरचे जिल्हाधिकारी एम. हरी नारायणन यांनी दिली.  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले होते. आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे आणि रुग्णालयाकडे पुरेसा ऑक्सिजनचा साठा आहे. तसंच ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच असून आणखी टँकर सकाळी दाखल होणार आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. ऑक्सिजन टँकर अतिशय महत्त्वाच्या क्षणी दाखल झाल्याने मोठा दुर्घटना टळली. आता चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही. सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. तसंच यात कुठलिही तांत्रिक चूक नव्हती, असंही जिल्हाधिकारी हरी नारायणन यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

तिरुपतीमधील रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची खरबदारी घेण्याचे निर्देशही रेड्डी यांनी दिले आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतोय की नाही याची वेळोवेळी खबरदारी घेण्यात यावी. तसंच तज्ज्ञांकडून तंत्रज्ञांची माहिती करून घ्यावी. रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यावर लक्ष द्यावं. ऑक्सिजनची वाहतूक आणि पुरवठा सुरूच आहे. त्याकडे लक्ष देऊ नये, असे निर्देश रेड्डी यांनी दिले.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनAndhra Pradeshआंध्र प्रदेशtirupati-pcतिरुपतीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी