शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दिल्लीत एकाच घरात सापडले 11 मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 10:30 IST

उत्तर दिल्लीतल्या बुरारी भागात एका घरात लटकलेल्या अवस्थेत 11 मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली- उत्तर दिल्लीतल्या बुरारी भागात एका घरात 11 मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन कुटुंबातील 11 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे प्रकरण आत्महत्येचं आहे की सामूहिक हत्येचं याचा पोलीस तपास करत आहेत.अद्यापही या 11 जणांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं आत्महत्या करण्याचं कारण काय असेल, याचाही पोलीस शोध घेत आहेत. नवी दिल्लीतल्या संतनगरमधल्या गुरुगोविंद सिंह रुग्णालयासमोरच्या गल्ली नंबर 2मध्ये ही घटना घडली आहे. मृतांपैकी 10 जणांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. तसेच 10 मृतदेह रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत सापडलेत. तर एक मृतदेह जमिनीवर सापडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्यांपैकी काहींचे हात बांधण्यात आले होते, तर काहीचे पाय बांधण्यात आले होते. तर काहींच्या तोंडावर पट्टीदेखील बांधली होती. बुरारीच्या ज्या परिसरात हे मृतदेह सापडले आहेत, तिथे लोकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळीच अशा प्रकारची घटना समोर आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेली व्यक्ती ही दोन भावांच्या कुटुंबातील असून, मृतांमध्ये 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील एक जण प्लायवुडचा धंदा करत होता, तर दुस-याचं किराणा मालाचं दुकान होतं.  

टॅग्स :delhiदिल्लीDeathमृत्यू