शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 07:03 IST

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी चुकीचे ठरवले आहे.

नाशिक : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी चुकीचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रालयात अपील केले आहे. अर्थात, त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम ठेवण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी पूजा खेडकर यांची वादग्रस्त कारकिर्द चर्चेत आली. त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा वाददेखील चर्चेत आला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर आणि ओबीसी प्रमाणपत्रदेखील संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याने नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे त्यासाठी चौकशीची जबाबदारी देण्यात आली होती. त्या आधारे विभागीय आयुक्तांनी हा निकाल दिला आहे. गेडाम यांनी त्यांच्याकडे दोन्ही प्रमाणपत्रांच्या पुष्ट्यर्थ अनेक प्रमाणपत्रे मागितली होती. मात्र, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी पुरेशी कागदपत्रे त्या देऊ शकल्या नाहीत.

खेडकर यांनी मंत्रालयात दाखल केले अपील पूजा खेडकर यांचे वडील वर्ग एकचे अधिकारी असले तरी त्यांनी मूळ सेवा बदलून घेतली हेाती. तसेच आईवडिलांच्या घटस्फोटानंतर आपले उत्पन्न घटले हा त्यांचा मुद्दाही वैध ठरला नाही.  स्वत: पूजा यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या शपथपत्रांच्या माहितीतदेखील तफावत आढळल्याने अपूर्ण माहिती तसेच दिलेल्या माहितीतील तफावत या आधारे त्यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांनी चुकीचे ठरवले; तर दुसरीकडे वंजारी जात म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम ठेवण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांच्या निकालाविरुद्ध खेडकर यांनी मंत्रालयात अपील केले आहे.

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरMaharashtraमहाराष्ट्र