शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदासाठी शोभाक्का? भविष्याचा वेध घेऊन भाजप देऊ शकतो संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 06:17 IST

जुळेल समीकरण, भविष्याचा वेध घेऊन भाजप देऊ शकतो संधी

सुनील चावके लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजप आणि जनता दल सेक्युलर यांचे समीकरण जुळून आल्यास केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या सर्वात विश्वासू, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा अनपेक्षित चेहरा ठरू शकतात. 

कर्नाटकात भाजपची सारी भिस्त लिंगायत समाजाच्या मतांवर आहे. तशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी या लिंगायत नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची लिंगायत मतांवरील पकड खिळखिळी झाल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत भाजप-जद सेक्युलर संभाव्य युतीत वक्कलिग समाजाच्या ५६ वर्षीय शोभा करंदलाजे यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. 

‘शोभाक्का’ ठरणार हुकमाचा एक्का? कर्नाटकच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या येदियुरप्पांच्या मनासारखे करण्याबरोबरच भाजपला भविष्यातील राजकारणासाठी उपयुक्त ठरणारे लिंगायत-वक्कलिग समीकरण जुळवून आणण्याची संधीही ‘शोभाक्कां’मुळे मिळू शकते. अर्थात, काँग्रेसला बहुमताने हुलकावणी देऊन कर्नाटक विधानसभा त्रिशंकू झाली तरच ते शक्य आहे.

 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीKarnatakकर्नाटकBJPभाजपा