शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena: सावरकरांचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष दुर्लक्षित करता येणार नाही, शिवसेनेनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 08:55 IST

मोदींनी केवळ लाल किल्ल्यावरुन भ्रष्टाचार संपविण्याची घोषणा करु नये, ती कृतीतून करावी, असा टोला खासदार चतुर्वेदी यांनी लगावला आहे. 

मुंबई - शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर आपलं मत व्यक्त केलं. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना देशातील दोन समस्यांना संपवायचं असल्याचं म्हटलं. त्यात, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला संपवून टाकायचं आहे. ज्यांनी देशाला लुटलं त्या लुटणाऱ्यांकडून आता लुटलेला माल परत घ्यायची वेळ आलीय, असेही मोदींनी म्हटले होते. त्यानंतर, शिवसेनेकडून यावर जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मोदींनी केवळ लाल किल्ल्यावरुन भ्रष्टाचार संपविण्याची घोषणा करु नये, ती कृतीतून करावी, असा टोला खासदार चतुर्वेदी यांनी लगावला आहे. 

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलेल्या मुलाखतीत मोदींचे भाषण आणि स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांच्या योगदानाबद्दल भाष्य केलं. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही महात्मा गांधींचा तिरस्कार करुन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत गोडसेंवर लक्ष केंद्र करता. पण, हा देश महात्मा गांधींच्या ऊर्जेवर आणि त्यांच्या तत्वानेच चालत आला आहे. जर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही महात्मा गांधींचं नाव घेत असतील, तर तेही गांधींचाच मार्ग अवलंबत असतील, अशी मला आशा आहे, असेही चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देशाच्या उभारणीत अनेक कुटुंबांचं योगदान आहे. त्यामध्ये, स्वातंत्र्य सैनिक, सैन्यदल, न्यायालयीन, प्रशासकीय अधिकारी यांसह अनेक परिवारांनी आपलं योगदान दिलं आहे. नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे गांधी परिवारावर केलेल्या टिकेला प्रियंका यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे. 

सावरकराचं योगदान दुर्लक्षित करता येणे नाही

स्वातंत्र्य लढ्यातील विनायक दामोदर सावरकर यांचंही योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष लक्षवेधी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं महत्त्वाचं योगदान दिलं आहे. म्हणूनच, सावरकरांचही महत्त्व दुर्लक्षित होता येणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरIndiaभारतIndependence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदी