शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची मोठी घोषणा; उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढणार, भाजपवरही गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 19:36 IST

या बैठकीत शिवसेनेने आरोप केला आहे, की भाजप सरकारच्या शासन काळात राज्यातील कायदा आणि सूव्यवस्था पूर्णपणे फेल झाली असून महिलाही असुरक्षित आहेत.

लखनौ - उत्तर प्रदेशात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच आता, शिवसेनाही राज्यातील सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवेल, अशी घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपवरही गंभीर आरोप करण्यात आले. (Shivsena says will fight in all 403 seats in uttar pradesh assembly election 2022)

या बैठकीत शिवसेनेने आरोप केला आहे, की भाजप सरकारच्या शासन काळात राज्यातील कायदा आणि सूव्यवस्था पूर्णपणे फेल झाली असून महिलाही असुरक्षित आहेत.

दारुलशफा येथे झालेल्या या बैठकीत राज्याचे प्रमुख ठाकूर अनिल सिंह म्हणाले, उत्तर प्रदेशातील योगी सरकार ब्राह्मणांबरोबर योग्य पद्धतीने वागत नाही. तसेच राज्यातील वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण व्यवस्थेची स्थितीही अत्यंत खराब आहे. एवढेच नाही, तर बेरोजगारी आणि महागाईनेही जनता त्रस्त झाली आहे, असेही ठाकूर म्हणाले.

बंद 'करुन दाखवलं' याचे श्रेय घेणार का?, आमदार राणेंचा ठाकरे सरकारला सवाल

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप? -देशातील पाच राज्यांत पुढील वर्षी म्हणजेच 2022मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात उत्तर प्रदेश हे सर्वात महत्वाचे राज्य आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एबीपी सी-व्होटरने उत्तर प्रदेशात सर्व्हे केला. यानुसार, उत्तर प्रदेशात भाजपला 259 ते 267 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय समाजवादी पक्षाला 109 ते 117 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, बीएसपीला 12 ते 16 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 3 ते 7 जागा आणि इतरांना 6 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा