शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपाला बहुमत मिळू नये ही तर गडकरींची इच्छा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 18:25 IST

'भाजपाला 150 जागा मिळाल्यास गडकरी पंतप्रधान होऊ शकतात'

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याच क्षणाची वाट पाहत आहेत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. गेल्या काही महिन्यांमध्ये मोदींची जादू ओसरली आहे. तर राहुल गांधी अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि याला मोदी जबाबदार असतील, असं राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये असलेल्या लेखात म्हटलं आहे. देशातील सध्याची परिस्थिती भाजपासाठी अनुकूल नाही. तीन राज्यांमधील जनतेनं भाजपाविरोधात कौल दिला आहे, असं राऊत यांनी त्यांच्या लेखात नमूद केलं आहे. भाजपाला बहुमत न मिळाल्यास गडकरींनी पंतप्रधानाची संधी असेल आणि सध्या गडकरी त्यांच्या विधानातून त्याचेच संकेत देत आहेत, असं त्यांनी लेखात म्हटलं आहे. 'भाजपाला 150च्या आसपास जागा मिळाल्यास गडकरी पंतप्रधान होऊ शकतात. त्यांच्या नावाला इतर नेतेही संमती देतील. अतिशय झपाट्यानं काम करणारे मंत्री अशी त्यांची मंत्रिमंडळात ओळख आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो,' असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक असलेल्या राऊत यांनी लेखातून पंतप्रधान मोदींवर तोंडसुख घेतलं आहे. मोदींना 2014 मध्ये स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र त्यांना ही संधी पूर्णपणे गमावली. 2014 मध्ये मोदींच्या समर्थनाची लाट होती. कारण काँग्रेसचा पराभव करण्याचा निश्चय लोकांनी केला होता. मात्र आता देशातील परिस्थिती बदलली आहे. मोदींची प्रतिमा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. राहुल गांधींची प्रतिमा मोदींइतकी मोठी नाही. मात्र आता त्यांना महत्त्व मिळू लागलं आहे. कारण मतदार सध्याच्या सरकारवर नाराज आहेत, असं विश्लेषण राऊत यांनी केलं आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान