शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena: गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांनी रात्रीच सुरत गाठले, एकनाथ शिंदे 1.30 वाजता पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 10:33 IST

विशेष म्हणजे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही आपला नियोजित कार्यक्रम सोडून रात्रीच सूरतला पोहचले होते. 

मुंबई - राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. मात्र, भाजपाने विजय खेचून आणल सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे, महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. त्यातच, शिवसेना नेते एकनाथ शिंदे अचानक गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही आपला नियोजित कार्यक्रम सोडून रात्रीच सूरतला पोहचले होते. 

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले. मात्र या विजयानंतर सचिन आहिर वगळता शिवसेनेच्या एकही बड्या नेत्याने माध्यमांशी संवाद साधला नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं. आता, एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. तर, गुजरातमध्ये शिंदेंसोबत २५ आमदारांचा गट असल्याची सुत्रांची माहिती आहे. 

शिवसेनेच्या 10 ते 12 आमदारांचा गट रात्री 10 वाजता सूरतला पोहोचला आहे. तर, मंत्री एकनाथ शिंदेंसह इतर आमदार सूरतला पोहोचले असून एकूण 25 आमदारांचा गट गुजरातच्या सूरतमध्ये असल्याचे समजते. विशेष म्हणजे गुजरात भाजपकडून या आमदारांना सहकार्य आणि मदत करण्यात येत आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील हेही काल रात्रीच सुरतला पोहोचले होते. विशेष म्हणजे गांधीनगरमधील त्यांच्या नियोजित कार्यक्रमात बदल करून ते सुरतला पोहोचले असून सुरत हा पाटील यांचाच गड आहे. मात्र, अद्याप त्यांची शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यासोबत बैठक किंवा चर्चा झाली नाही. दरम्यान, शिवसेनेत मतभेद असल्याचं गुजरातमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटल्याची माहिती आहे.

शिवसेना आमदारांची आज बैठक

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर सर्वच आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईBJPभाजपाGujaratगुजरात