शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांस, चिकनची ५०० दुकाने केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:30 IST2017-09-23T04:30:27+5:302017-09-23T04:30:30+5:30
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांस आणि चिकनची ५०० हून अधिक दुकाने बळजबरीने बंद केली आहेत. आम्ही अशा सर्व दुकानांना नोटीस दिली होती, असे शिवसेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते ऋतू राज यांनी सांगितले. आम्ही उपायुक्तांना निवेदन देऊन नऊ दिवस ही दुकाने बंद करण्याची मागणी केली होती.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांस, चिकनची ५०० दुकाने केली बंद
गुरगाव : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मांस आणि चिकनची ५०० हून अधिक दुकाने बळजबरीने बंद केली आहेत.
आम्ही अशा सर्व दुकानांना नोटीस दिली होती, असे शिवसेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते ऋतू राज यांनी सांगितले. आम्ही उपायुक्तांना निवेदन देऊन नऊ दिवस ही दुकाने बंद करण्याची मागणी केली होती.
तथापि, प्रशासनाने ही दुकाने बंद करण्याचे आदेश दिले नाहीत. बळजबरीने ही दुकाने बंद करण्यात आली असल्यास संबंधितांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले. (वृत्तसंस्था)